Breaking News
Home / मालिका / मन धागा धागा जोडते नवा मालिकेत ट्विस्ट.. आदर्श सोबत नाही तर सार्थक सोबतच होणार आनंदीचे लग्न
divya pugaonkar anandi sarthak wedding
divya pugaonkar anandi sarthak wedding

मन धागा धागा जोडते नवा मालिकेत ट्विस्ट.. आदर्श सोबत नाही तर सार्थक सोबतच होणार आनंदीचे लग्न

स्टार प्रवाहवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत आनंदी आणि सार्थकच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. दिव्या पुगावकर आणि अभिषेक रहाळकर या कलाकारांनी मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मालिकेत सार्थक आणि आनंदीचे लग्न व्हावे अशी प्रेक्षकांची देखील इच्छा होती. मात्र आता मालिकेत आदर्शसाठी आनंदीचे स्थळ सुचवण्यात आले आहे. आदर्शचे देखील पहिले लग्न झाले होते त्यामुळे ही गोष्ट तो आनंदीसमोर मोकळेपणाने कबूल करतो.

divya pugaonkar
divya pugaonkar

तर आनंदी सुद्धा तिच्या आयुष्यातील घटनांचा खुलासा करते. त्यामुळे लवकरच मालिकेत आदर्श आणि आनंदीच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळणार आहे. मालिकेत या लग्नसोहळ्याचे शूटिंग नुकतेच पार पडले आहे. या लग्नात मात्र प्रेक्षकांना अपेक्षित असा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. सार्थकचे ज्या मुलीसोबत प्रेम असते हे त्याने डायरीत लिहून ठेवलेले असते. ही डायरी तो आदर्शपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण सार्थकची बहीण मात्र आनंदीचे लग्न सार्थक सोबतच व्हावे म्हणून प्रयत्न करत असते. सार्थकला होणारा त्रास ती जवळून अनुभवत असते. आदर्श आणि आनंदी दोघेही लग्नाच्या बोहल्यावर चढणार तेवढ्यात आदर्शला सार्थकबद्दल सगळं सत्य समजणार आहे.

man dhaga dhaga jodate nava serial
man dhaga dhaga jodate nava serial

सार्थक ज्या मुलीसोबत प्रेम करतो ती दुसरी तिसरी कोणी नसून आनंदीच आहे हे सत्य त्याला उलगडणार आहे. आणि म्हणूनच तो भर मंडपात आनंदीचे त्याच्यासोबत लग्न लावून देणार आहे. सार्थकच्या हातून आपल्या गळ्यात मंगळसूत्र पडलं आहे याचा आनंदीला सतत आठवत असतं हे कुठले संकेत आहेत याचा ती सतत विचार करत असते. सार्थकचे आपल्यावर प्रेम आहे हे आनंदीला ठाऊक नसते त्यामुळे मालिकेत सार्थकची झालेली घालमेल प्रेक्षकांनाही बघवेनासी झाली आहे. आनंदीचे सार्थकसोबत लग्न व्हावे म्हणून मालिकेचे चाहते त्या ट्विस्टकडे आस लावून आहेत. पण आता प्रेक्षकांचा हिरमोड होणार नाही हे आता येणाऱ्या ट्विस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आदर्श स्वतःच आनंदीचे सार्थक सोबत लग्न जुळवून देणार आहे.

मालिकेचा हा अपेक्षित ट्विस्ट पाहायला प्रेक्षकही तेवढेच उत्सुक झालेले आहेत. दिव्या पुगावकर हिने या अगोदर मुलगी झाली हो मालिका गाजवली होती. आनंदीच्या भूमिकेतही ती प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. तर अभिषेक रहाळकर तू तेव्हा तशी मालिकेनंतर प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. अभिषकने साकारलेला सार्थक प्रेक्षकांनाही विशेष भावला आहे. त्याचमुळे मालिकेत या दोघांचे लग्न व्हावे अशी प्रेक्षकांचीही ईच्छा आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.