Breaking News
Home / जरा हटके / “त्यांना वाटलं की पुणेरी माजात बोलतोय”.. अश्विन चितळेने सांगितला रोमँटिक चित्रपटाच्या ऑफरचा किस्सा
ashwin chitale shwas movie
ashwin chitale shwas movie

“त्यांना वाटलं की पुणेरी माजात बोलतोय”.. अश्विन चितळेने सांगितला रोमँटिक चित्रपटाच्या ऑफरचा किस्सा

श्वास या गाजलेल्या  चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेला बालकलाकार अश्विन चितळे तुम्हाला आठवतो का. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर अश्विन देवराई, शाळा, आशाऍं, टॅक्सी नं नौ दो ग्याराह अशा १६ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. अश्विनने चित्रपटात काम करण्यासोबतच आपल्या शिक्षणाला प्राधान्य दिले. इंडोलॉजीचे शिक्षण घेतल्यानंतर अश्विनने फारसी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळवले. सध्या तो सुफी कवी रुमी यांच्या गझलांचे कार्यक्रम सादर करतो. या कार्यक्रमांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अश्विनने नुकतीच एक मुलाखत दिली आहे.

ashwin chitale rumi
ashwin chitale rumi

या मुलाखतीत अश्विन आपल्या शिक्षणाबद्दल आणि कट्टर धर्मगुरू असलेल्या रुमी बद्दल भरभरून बोलतो. यातच त्याने रोमँटिक चित्रपटात काम का केले नाही याचाही एक किस्सा इथे शेअर केला. एका मोठ्या दिग्दर्शकाचे नाव न घेता अश्विन म्हणतो की, श्वास नंतर मी जवळपास १६ चित्रपटात काम केले. १२ वी नंतर मला जसे चित्रपट अपेक्षित होते तसे न मिळता टिपिकल रोमँटिक चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या. एकदा एका मोठ्या दिग्दर्शकाच्या ऑफिसमधून फोन आला. ऑफकोर्स मी ते नाव नाही घेणार. ते म्हणाले की असा असा एक रोमँटिक चित्रपट करायचाय. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की अहो, तुम्हाला माहितीये का मी कोण आहे ते. त्यांना वाटलं की मी पुणेरी माजात बोलतोय.

ashwin chitale
ashwin chitale

म्हणजे तसं नाही म्हणत आहे मी, तुम्ही मला कधी बघितलंय का? नाचगाण्यासाठी हिरो हिरॉईनसाठी जी पर्सनॅलिटी लागते ती माझी नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही मला जे रोमँटिक पद्धतीचे सिनेमे ऑफर करताय तर तुम्हाला माहीतीये का मी कसा दिसतोय ते? असा माझा प्रश्न होता. तर त्यांना आधी ते वाटलं ते मिसअंडरस्टँडिंग झालं ते मी क्लिअर केलं. त्याच्यावर ते म्हणाले की, नाही अहो आजकाल काय कुणीही चालतं. आणि त्या वाक्याने मला काहीतरी झालं. कुणीही जर का चालत असेल तर मला हे नाही करायचं. एकतर मला असं वाटतं की श्वास मध्ये मी जे काही काम केलं ते माझ्याकडून करवून घेतलं. त्यातल १०० टक्के क्रेडिट हे संदीप सावंत जे दिग्दर्शक आहेत श्वासचे त्यांनाच जातं. मला तसे चित्रपट करायचे नव्हते म्हणून मी यातून बाहेर पडलो. असे म्हणत अश्विनने रोमँटिक सिनेमाला नकार दिला होता.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.