मराठी सृष्टीला चांगले दिवस आले आहेत असे बोलले जाते कारण गेल्या दोन वर्षांपासून मराठी चित्रपट तो ऐतिहासिक असो वा कौटुंबिक त्याला प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे. गेल्याच महिन्यात ३० जून रोजी प्रदर्शित झालेला बाईपण भारी देवा हा चित्रपट सुध्दा यशस्वी चित्रपटाच्या यादीत बसतो. गेल्या १२ दिवसात या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर २६ कोटी १९ लाखांची कमाई करत यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा मिळत असलेलेला प्रतिसाद पाहून ‘हा चित्रपट आता आमचा नाही तर प्रेक्षकांचा झाला आहे’ अशी प्रतिक्रिया केदार शिंदे देतात. बाईपण भारी देवा चित्रपट यशस्वी योण्यामागे बरेच हात आहेत.
उत्तम कथानक, दिग्दर्शन आणि दमदार कलाकार, साजेशी गाणी हे सगळंच छान जमून आल्याचे दिसून येते. या चित्रपटाचे नाव बाईपण भारी देवा हे ऐन वेळेला देण्यात आले, कारण याअगोदर चित्रपटाचे नाव मंगळागौर असावे असे ठरवण्यात आले होते. मग हे नाव का बदलण्यात आलं याचा किस्सा केदार शिंदे यांनी नुकताच सांगितलेला आहे. याशिवाय चित्रपटाचा शेवट सुद्धा वेगळा असणार होता मात्र बाईपण भारी देवा चित्रपटातील गाण्याची कॅच लाईन जी होती ती अजित भुरे यांना खूपच आवडली होती. वलय मूलगुंड यांनी हे गाणं लिहिलेलं आहे. स्त्री केंद्रस्थानी ठेवून तिच्या भावभावना या गाण्यात उत्तम पद्धतीने मांडण्यात आल्या. यासंदर्भात केदार शिंदे खुलासा करताना म्हणतात की, “बाईपण भारी देवा हे सिनेमाचं नाव नव्हतं. त्याचं working title होतं “मंगळागौर”.
नाव बदलण्याचा विचार आला तेव्हा अजित भुरे यांनी सुचवलं की, गाण्याची catch line जी आहे ती ठेवली तर? बाईपण भारी देवा याचं credit पुर्ण वलय मुलगुंड या गीतकाराचं आहे. ते गाणं त्याने फारच अप्रतिम लिहिलं आहे. स्त्री केंद्रस्थानी ठेवून तीच्या भावभावना उत्तम मांडल्या आहेत. आणि ती शेवटची कविता! माझी मैत्रीण अश्विनी भगवाडकर त्यावेळी मदतीला धावून आली. या सिनेमाचा शेवट वेगळा होता. पण मंगळागौर गाणं संपल्यावर एवढ्या उंचीवर गेल्यानंतर पुन्हा कुठला सीन करणं जड जाणार होतं. ही कवितेची आयडिया डोक्यात आली. संपुर्ण सिनेमाचा सार व्यक्त करणारी ती कविता अश्विनीने लिहिली. लेखिका वैशाली नाईक, युगेशा ओंकार वेशभूषा, अतुल देशपांडे Sound Recordist, महेश कुडाळकर Art director या दोघांचीही कामगिरी महत्त्वाची होती. या प्रवासात असंख्य माणसं महत्वाची ठरली. कोटीची उड्डाणं करणारा हा सिनेमा तयार होताना ही मंडळी विसरून चालणार नाहीत.”