Breaking News
Home / नाटक / ​ओळखीचा चेहरा की चेहऱ्याची ओळख? टोकाच्या वादातील विलक्षण संवादपूर्ण नाटक
girish oak shweta pendse
girish oak shweta pendse

​ओळखीचा चेहरा की चेहऱ्याची ओळख? टोकाच्या वादातील विलक्षण संवादपूर्ण नाटक

नाट्यसृष्टीत वैविध्यपूर्ण विषयांवरील नवीन अनेक नाटके रसिक प्रेक्षकांसाठी दाखल झाली आहेत. विनोदी, गंभीर, सस्पेन्स विषयावरील नाटक अनोख्या शैलीत प्रेक्षकांपर्यंत मार्मिकपणे मांडणारे दिग्दर्शक विजय केंकरे हे नाव अग्रस्थानी आहे. ३८ कृष्ण व्हिला हे नवं नाटक घेऊन ते रंगभूमीवर आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या नाटकात अभिनयाचा हुकमी एक्का असलेले अभिनेते डॉ गिरीश ओक आणि संवेदनशील लेखिका आणि अभिनेत्री डॉ श्वेता पेंडसे दिसणार आहेत. गिरीश ओक यांचे हे ५० वे नाटयपुष्प ठरणार आहे. या त्रिवेणी संगमामुळे  हे नाटक प्रेक्षकांसाठी रंजनाची दर्जेदार मेजवानी असणार यात शंका नाही. मल्हार आणि रॉयल थिएटर निर्मित या नाटकाचा शुभारंभ प्रयोग प्रचंड प्रतिसादात शनिवार १९ मार्चला पार पडला.

girish oak shweta pendse
girish oak shweta pendse

ओळखीचा चेहरा की चेहऱ्याची ओळख? नाटकाची ही टॅगलाइन त्यातील गर्भित अर्थ दाखवून देणारी आहे. प्रत्येकजण येथे आपापले मुखवटे सांभाळून असतो, प्रसंगी त्यांना जपत असतो. मुखवट्याआडचा खरा खोटा, असेल तसा चेहरा दिसू नये म्हणून काळजी घेत असतो. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. गझलकार इलाही जमादार यांच्या या ओळीतुन चेहऱ्यामागचं खरं गुपित उलगडून दाखवलयं. ३८ कृष्ण व्हिला या नाटकातूनही चेहऱ्यामागचा माणूस शोधण्याचा प्रयत्न असणार आहे. गिरीश ओक ‘देवदत्त कामत’ या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहेत. देवदत्त कामत ह्या प्रतिष्ठित व्यक्तीवर नंदिनी चित्रे ही अनोळखी स्त्री एक गंभीर आरोप करते. आणि त्यांच्यापुढे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे आव्हान उभे राहते.

38 krushna villa natak
38 krushna villa natak

कृष्ण व्हिला ह्या घरात भरला जातो एक आगळा वेगळा खटला. सुरू होते आरोप प्रत्यारोपांची मालिका, वाद प्रतिवादांच्या फैरी झडतात. आणि समोर येते एक धक्कादायक वास्तव! या पार्श्वभूमीवर बेतलेले हे नाटक अनेक रंजक वळणांनी प्रेक्षकांच मनोरंजन करणार असणार आहे. डॉ श्वेता पेंडसे लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित तसेच डॉ गिरीश ओक, डॉ श्वेता पेंडसे अभिनीत ३८ कृष्ण व्हिला या नाटकाचा शुभारंभ दीनानाथ नाटयगृह पार्ले येथे पार पडला. तसेच रविवार २० मार्चला दुपारी ४.३० गडकरी रंगायतन येथे प्रयोग असणार आहे. या नाटकाची निर्मीती मिहीर गवळी यांनी केली असून सहनिर्माते उत्कर्ष मेहता, ऋतुजा शिदम आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. संगीत अजित परब तर प्रकाशयोजना शितल तळपदे यांची आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.