राधा प्रेमरंगी रंगली या मालिकेतून वीणा जगतापने मराठी मालिका सृष्टीत एन्ट्री घेतली होती. प्रमुख भूमिकेत झळकलेली वीणा काही मोजक्या मालिकेतून सहाय्यक भूमिका साकारताना दिसली. मराठी बिग बॉसच्या सिजन २ मध्ये वीणा जगतापचे शिव ठाकरे सोबत सूर जुळले तेव्हा हे दोघे लग्न करणार अशी चर्चा रंगू लागली. मात्र त्यानंतर अवघ्या काही महिन्यांच्या डेट नंतर दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. विणा आणि शिव दोघेही आता कपल म्हणून ओळखले जात नसले तरी त्यांच्यातली मैत्री मात्र आजही अबाधित आहे. विणाला जेव्हा तिच्या एका फॅनने अश्लील मेसेज केला होता.
शिव ठाकरेने त्यावेळी त्या तरुणाचा खरपूस समाचार घेतला होता. पण त्यानंतरही वीणाने शिवपासून ब्रेकअप का केले असे प्रश्न तिला विचारले जाऊ लागले, तेव्हा तिने अशा चर्चा थांवण्याचे आवाहन केले. वीणा गेली काही दिवस कुठल्याच प्रोजेक्टमध्ये दिसत नव्हती तेव्हा ती प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स करत होती. पण जेव्हा विणाने प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बनल्याची घोषणा केली. तेव्हा मात्र मीडियातील तिच्याच काही जवळच्या मैत्रिणींनी अशी बातमी छापून आणली की, विणाने अभिनय क्षेत्र सोडून दिले आणि ती आता मेकअप आर्टिस्ट बनली. ही बातमी वाचताच विणाला खूप मोठा धक्का बसला. कारण मी अजून असे कुठेही म्हटले नव्हते की मी अभिनय क्षेत्र सोडून देणार.
विणाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे या मुलाखतीत तिने या बातमीचा खरपूस समाचार देखील घेतलेला पाहायला मिळतो. ज्या व्यक्तीने ही बातमी छापली त्या व्यक्तीने कमीत कमी माझ्याशी बोलायला तरी हवं होतं. पण तिने कुठलाही विचार न करता ती बातमी छापून आणली. यामुळे बाकीच्या मीडियातील लोकांनीही तशाच आशयाची बातमी दिली. किमान कोणीतरी मला याबाबतीत विचारायला हवं होतं की खरंच तू अभिनय क्षेत्र सोडतीयेस का म्हणून. या एका गोष्टीमुळे माझं करिअर बरबाद होऊ शकतं याचा कोणीच कसा विचार केला नाही. मी अभिनय क्षेत्र सोडलेलं नाही, मी आजही चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे, माझ्याकडे कामं येत आहेत आणि मला चांगल्या चांगल्या भूमिका करायच्या आहेत.