गेल्या काही दिवसांपूर्वी मराठी सृष्टीतील लिटिल चॅम्प्स मधील गायक मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी आमचं ठरलं असे म्हणत जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर प्रेक्षकांनी या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. एवढंच नाही तर प्रथमेशच्या पहिल्या केळवणाचा थाट देखील सजलेला पाहायला मिळाला. प्रथमेश आणि मुग्धा या दोघांनी लग्न कधी करणार याची तारीख अजूनही जाहीर केलेली नाही. पण जेव्हा ठरेल तेव्हा तुम्हाला कळवले जाईल असे या दोघांनी चाहत्यांना म्हटले आहे.
त्यामुळे या दोघांची लगीनघाई कधी सुरू होणार याची उत्सुकता शिगेला असतानाच मराठी सृष्टीतील आणखी एका अभिनेत्रीने आमचं ठरलं असे म्हणत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. ही अभिनेत्री आहे दिल दोस्ती दुनियादारी मालिका फेम स्वानंदी टिकेकर. स्वानंदी टिकेकर ही मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची लडकी लेक आहे. स्वानंदी उत्तम अभिनय तर करतेच पण ती गाते सुद्धा उत्तम. विविध कार्यक्रमातून तिच्या गाण्याची झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली आहे. नुकतेच स्वानंदीने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. आमचं ठरलं असे म्हणताच तिच्या या पोस्टवर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. खर तर हे सेलिब्रिटी स्वानंदीच्या या गुपितावर अगोदरच नजर ठेवून होते.
त्यांना तिचा बॉयफ्रेंड कोण हे माहीत होते पण ते दोघे स्वतः जाहीर कधी करतात यावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे स्वानंदीच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. स्वानंदीच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे आशिष कुलकर्णी. आशिष कुलकर्णी आणि स्वानंदी हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आणि आता हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जाते. आशिष कुलकर्णी हा गायक आहे. देशविदेशात तो त्याच्या गाण्याचे कार्यक्रम करतो. इंडियन आयडॉलच्या १२ व्या सिजनमध्ये त्याने परफॉर्मन्स करून प्रेक्षकांची आणि परिक्षकांची वाहवा मिळवली होती. स्वानंदी आणि आशिष दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्यामुळे ते दोघे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.