Breaking News
Home / जरा हटके / मालिकांमध्ये आता शिस्त राहिली नाही.. सुकन्या कुलकर्णी यांनी सांगितल्या शांती मालिकेच्या आठवणी
sukanya mone baipan bhaari deva
sukanya mone baipan bhaari deva

मालिकांमध्ये आता शिस्त राहिली नाही.. सुकन्या कुलकर्णी यांनी सांगितल्या शांती मालिकेच्या आठवणी

सुकन्या कुलकर्णी या मराठी सृष्टीतील एक हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. मराठी हिंदी मालिका सृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बाईपण भारी देवा या चित्रपटात त्या एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्या. याच चित्रपटातून त्यांची मुलगी जुलिया ही देखील झळकली आहे. सुकन्या कुलकर्णी यांनी मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी शांती या गाजलेल्या हिंदी मालिकेच्या काही खास आठवणी सांगितल्या. सोबतच आजच्या घडीच्या मालिकांबाबत एक खदखद देखील व्यक्त केलेली पाहायला मिळाली.

aga aga sunbai kay mhanta saubai shanti
aga aga sunbai kay mhanta saubai shanti

शांती ही दूरदर्शनवरची सर्वात गाजलेली मालिका होती. मालिकेबाबत सुकन्या कुलकर्णी म्हणतात की, आभाळमाया ही मराठी सृष्टीतील सगळ्यात गाजलेली मालिका होती किंवा शांती मी ज्यावेळी करायचे. त्यावेळी मालिकेत उद्या काय चित्रित होणार आहे त्याची स्क्रिप्ट कलाकारांना आदल्या दिवशी मिळायची. उद्या काय डायलॉग म्हणायचेत ते सगळे आम्हाला आदल्या दिवशी दिले जायचे. आम्ही सेटवर असलो की त्या स्क्रिप्ट आम्हाला हातात मिळायच्या की उद्या कुठले कुठले सिन होणार आहेत. आम्ही जर सेटवर नसलो तर त्या स्क्रिप्ट घरी यायच्या. सकाळी शूटिंग सुरू झालं की संध्याकाळी सहा वाजता स्वतः डायरेक्टर सगळ्यांचं पॅकअप करायचा. काही सिन राहिले असतील तर आपण ते उद्या करू असं म्हणायचा. उद्या सकाळी तो सिन घ्यायचा.

sanjay jadhav prashant damle
sanjay jadhav prashant damle

सहा वाजले की पॅकअप आणि घरी जा असं व्हायचं. पण आताच्या मालिकांमध्ये असं बघायला मिळत नाही, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली. अगं अगं सुनबाई काय म्हणता सासुबाई या मालिकेत सुकन्या कुलकर्णी प्रमुख भूमिकेत झळकल्या होत्या. या मालिकेच्या निर्मात्याची टीम खूप सपोर्टीव्ह आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आम्हाला या मालिकेत काम करताना आमच्या कामाचे पैसे कधीच मागावे लागले नाही असा शेराच त्यांनी निर्मात्यांना दिला होता. व बहुतेक कलाकारांना मालिकेत काम करताना कित्येक तास द्यावे लागतात. दहा बारा तास नाही तर कधीकधी एखाद्या शॉट साठी त्यांना रात्रीचा दिवस करावा लागत असतो. त्यामुळे कलाकारांच्या या बाजू समजून घ्यायला हव्या असं त्या यातून सुचवताना दिसत आहेत. आताच्या मालिकांमध्ये ही शिस्त अजिबात दिसत नाही असेही त्या मालिकेत काम करण्याबाबत म्हणतात.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.