रील लाईफमध्ये एकत्र काम करत असताना अनेक कलाकारांची मनं जुळली आहेत. अशातच आता कन्यादान मालिकेत नवरा बायकोची भूमिका साकारणारे शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कन्यादान मालिकेत काम करत असताना शुभंकरला त्याची सहनायिका आवडू लागली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काल मंगळवारी त्यानी मोठ्या थाटात साखरपुडा करून सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. या दोघांवर सेलिब्रिटींकडून तसेच चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शुभंकर एकबोटे हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे.
शुभंकरने आजवर अनेक मालिका तसेच चित्रपटातून काम केले आहे. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकत असतानाच शुभंकर नाटकातूनही काम करू लागला होता. कन्यादान मालिकेत त्याला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याच मालिकेत अमृता आपली सहनायिका आहे हे त्याला कळले. अर्थात मालिकेतला हा अनुभव सांगताना शुभंकर म्हणतो की, Look test for ‘कन्यादान’. एक सुंदर मुंबई girl माझ्या पत्नीच्या भूमिकेत काम करणार आहे म्हणून character photos आणि look च्या दृष्टीने ‘तिला नवरा म्हणून मिठीत घे आणि hold करा’ असे दिग्दर्शकाने सांगितले. त्या क्षणी आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं. जरी ती professional गोष्ट असली तरीही कुठेतरी दोघांच्याही नजरेतून एक चमक पटकन येऊन गेली.
हि चमक अवघडलेपणाची होती का येणाऱ्या काळाचा इशारा देणारी होती हे मात्र त्या क्षणी लक्षात नाही आलं. तरीही photo, Pose, Look हे सोपस्कार झाले! This was our reel hug which was somewhat awkward for me! आणि अशा तर्हेने आम्हा दोघांची somewhat awkward, happy, fresh & happening reel journey सुरु झाली! मग ह्या journey मध्ये कामामुळे रोजच्या रोज भेटी, संवाद, वेगवेगळ्या emotion चे scenes आणि त्याबद्दल होणारा संवाद हे सगळं सुरु झालं! हि journey एक एक station घेत सुमारे १ वर्ष ९ महिने अशीच चालू होती! अचानक एका station वर थोडी जरी संधी मिळाली तरी, एका दिवसाची सुट्टी मिळाली. थोडी जरी संधी मिळाली तरी माझ्या मूळ गावाकडे म्हणजेच माझ्या पुण्याकडे पळणारा मी.
अरे धावपळ का करतोस असा माझ्या बाबाचा ओरडा खाणारा मी २-३ दिवस सलग सुट्टी मिळूनही मुंबईतच थांबायला लागलो! हे का झाले? तर ‘कुछ बाते बस हो जाती है, और शायद इसे ही प्यार कहते हैं!’ हे माझ्या लक्षात आले! ‘घाईघाईत पुण्याला येऊ नकोस’ असं म्हणणारा माझा बाबा ‘अरे २२ दिवस सुट्टी मिळून सुद्धा का नाही येतेस तू ?’ असं म्हणायला लागला. कधीच कल्पनेच्या canvas वर नसलेलं चित्र माझं मन कधी नकळतपणे रंगवायला लागलं त्यात रंग भरू लागलं हे माझं मलाच समजलं नाही!ओळख तर reel journey मध्ये झालीच होती पण आता हळू हळू खऱ्या मैत्रीला सुरुवात झाली!
त्यात कामा व्यतिरिक्त भेटी, कोणत्याही विषयावर अवांतर चर्चा, रात्री उशिरापर्यंत घराजवळ कट्टा टाकणे. मुंबईतल्या वेगवेगळ्या special जागांवर फिरणं, खूप variety ची खवय्येगिरी, नाटक, सिनेमा, कविता, गाणी, SRK वर असलेलं unconditional प्रेम. मराठा मंदिरमध्ये जाऊन ddlj चा show एकत्र बघणं, third wave coffee, cadbury crackle, little hearts, marine drive, पुण्याची सफर, colaba causeway, crawford market आणि बरंच काही. हळू हळू मुंबईची local train जशी track हळुवारपणे change करते तसंच reel journey ने सुंदर real journey चा track change पकडला! राज अगर ये तुझे प्यार करती है तो ये पलटके देखेगी और लड़की ने पलटकर देखा!