शेवंताच्या भूमिकेमुळे अमाप लोकप्रियता मिळवलेली अपूर्वा नेमळेकर नुकतीच तिच्या आई सोबत दुबई वारी करताना दिसली. आभास हा या मालिकेतून अपूर्वाने मध्यवर्ती भूमिका साकारत छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. आराधना, तू जीवाला गुंतवावे, तू माझा सांगाती मालिकेत ती महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली. रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतून अपूर्वाला शेवंताची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या भूमिकेने अपूर्वाला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. अगदी लहान मुलं देखील अपूर्वाला शेवंता नावानेच हाका मारू लागले. या भूमिकेसाठी अपूर्वाने वजन वाढवले होते. रात्रीस खेळ चाले ३ मध्ये पुन्हा तीच्या वाट्याला शेवंताची भूमिका आली खरी.
मात्र या भूमिकेची लांबी कमी असल्याने तिला सेटवर तासंतास बसून ठेवले जायचे. सेटवरील तुच्छतेची वागणूक तसेच वजन वाढण्यावरून इतर कलाकारांकडून होणारा अपमान. हे तिला सहन न झाल्याने तिने ही मालिका अर्ध्यावरच सोडण्याचा निर्णय घेतला. अपूर्वा या मालिकेत दिसणार नव्हती त्यामुळे मालिकेचा टीआरपी देखील खाली घसरलेला पाहायला मिळाला. पर्यायाने रात्रीस खेळ चाले ३ ही मालिका लवकरात लवकर संपवण्यावर अधिक भर देण्यात येऊ लागला. या मालिकेनंतर अपूर्वा स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत दिसली. यात तिने राणी चेन्नमाची भूमिका बजावली. आस्क मी एनिथिंग या इंस्टा स्टोरीवर अनेक कलाकार आपल्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात.
अपूर्वा हिने देखील तिच्या इंस्टा स्टोरीवरून चाहत्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या एका चाहत्याने ‘तू सिंगल आहेस की तुझं लग्न झालंय?’ असा प्रश्न विचारला होता. खरं तर अपूर्वाने रोहन देशपांडे सोबत ७ वर्षांपूर्वी लग्न केले होते. मात्र आता अपूर्वा सिंगलच असल्याचे सांगते. चाहत्याच्या प्रश्नावर अपूर्वा म्हणते की, ‘मी सध्या तरी सिंगलच आहे आणि त्यात मी खुश आहे. पण तरीही मी माझ्या प्रिय व्यक्तीची वाट पाहतीये’. त्यामुळे अपूर्वा आपल्या खऱ्या जोडीदाराच्या शोधात आहे असेच संकेत तिने या उत्तरातून दिलेले पहायला मिळत आहे. तिच्या या उत्तरावरून लवकरच तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळेल अशी आशा आहे.