स्टार प्रवाह वाहिनीवर सहकुटुंब सहपरिवार ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेतील कलाकारांनी आणि संपूर्ण टीमने मला मानसिक त्रास दिला असल्याचे ज्येष्ठ अभिनेत्री “अन्नपूर्णा विठ्ठल” यांनी सांगितले आहे. अन्नपूर्णा विठ्ठल या हिंदी मराठी मालिका अभिनेत्री आहेत सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत त्यांनी लक्ष्मीची भूमिका साकारली आहे. मालिकेत काम करत असताना मला खूपच हीन दर्जाची वागणूक मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महिन्यातून माझे केवळ पाच ते सहा दिवसच शूटिंग असते परंतु मला पूर्ण महिनाभर सेटवर बसून राहावे लागते. मालिकेत माझा सिन शूट करायचा असतो त्यावेळी त्या म्हातारीला बोलवा म्हणून हाक मारली जाते. मालिकेत मला तोंड वाकडं करून बोलावं लागतं त्यामुळे माझ्या घश्याला त्रास होतो एकदा असाच सिन शूट करत असताना मला घश्याला त्रास व्हायला लागला तेव्हा रिटेक घ्यावा लागला मात्र त्यावेळी मी दिग्दर्शकाचा खूप ओरडा खाल्ला. बाकीचे कलाकार खूपदा रिटेक घेतात त्यावेळी कोणीच त्यांना ओरडलेलं मी पाहिलं नाही पण माझ्या वेळी नेहमीच असं वागवलं गेलं. माझा सिन नसतो त्यावेळी मी मेकअप रूममध्ये बसते पण तिथेही माझे बसणे मालिकेच्या कलाकारांना खटकते. इथं लोकं झोपा काढायला येतात असाच सूर माझ्याबाबत ऐकायला मिळतो. घरी गेल्यावर आज काय त्रास झाला हे मी सांगत असते पण हातातून मला मानसिक त्रास दिला जात आहे. मला सेटवर हीन दर्जाची वागणूक दिली जाते असं अन्नपूर्णा यांनी मालिकेच्या टीम बाबत आरोप लावताना म्हटलं आहे.
मी ह्या सर्व गोष्टी निर्मात्यांना सांगितल्या त्यावेळी त्यांनी कलाकारांना बोलावून त्यांची समजूत घातली आणि निर्मात्यांनी माझी माफी देखील मागितली परंतु ह्या सर्व गोष्टी माझ्यासाठी खूपच त्रासदायक आहेत मी कलाकारांविरोधात तक्रार करते म्हणून माझी बदनामी केली जात आहे. मला मालिकेतून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मालिकेच्या सेटवर देखील मला एकटं पाडलं जात असल्याचा आरोप अन्नपूर्णा यांनी लावला आहे. अन्नपूर्णा यांनी युट्युबवर एक व्हिडिओ शेअर करून त्यात त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल खुलासा केला आहे. हा प्रकार खूपच धक्कादायक असल्याचं मत अनेकांनी कमेंट्सद्वारे व्यक्त केलं आहे.