मराठी इंडस्ट्रीत स्थिरस्थावर होण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत ठरतात. वरिष्ठांची वेळोवेळी मनधरणी करणे, काम मिळावे म्हणून सतत पाठपुरावा करणे. सोशल मीडियावर सक्रिय राहणे या गोष्टी अंगीकारल्या की तुम्ही या इंडस्ट्रीत टिकून राहणार हे न चुकलेले गणित. मात्र अशाच एका कारणामुळे ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांनाही बऱ्याच चांगल्या भूमिकांपासून वंचित राहावे लागले आहे. सतीश पुळेकर मराठी चित्रपट नाट्य सृष्टीत नायक, खलनायक, सहाय्यक तसेच दिग्दर्शकाच्या भूमिकेत झळकले आहेत. अनेक मालिका, चित्रपट तसेच नाटकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले. ४ नोव्हेंबर १९५० साली मुंबईत एका सर्वसाधारण कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
बालपण काकांकडे शिवसेना भवन जवळ गेले. मग रानडे रोडला ते वास्तव्यास होते आजही ते तिथेच आपल्या पत्नीसोबत वास्तव्यास आहेत. शाळेत असताना त्यांचं क्रिकेटवर जास्त प्रेम होतं, पण आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांनी या क्षेत्रात येण्यास नकार दिला. सतीश पुळेकर यांचे वडील घरगुती घड्याळ दुरूस्तीचे काम करायचे त्यामुळे त्यांना मुलाचं स्वप्न पूर्ण करणे मुळीच शक्य नव्हते. मग शाळेतल्याच एका मित्राने लंगडी आणि खो खो खेळासाठी विजय क्लब मध्ये नेलं. ‘ह्या क्लबचे अनंत उपकार माझ्यावर आहेत, जे मी कधीही फेडू शकत नाही.’ असे सतीश पुळेकर म्हणतात. या क्लबमुळे १४ वर्षे ते खोखो खेळले अगदी नॅशनल लेव्हल पर्यंत बेस्ट प्लेअर म्हणून त्यांनी अनेक बक्षिसं मिळवली होती.
त्यामुळे नाटकांचे दिग्दर्शन करताना वेळ पाळणे आणि जसं काम हवं तसं करून घेणे हे अंगवळणी पडलं. दरम्यान अनेक कलाकारांना त्यांनी घडवलं. पुढे कॉलेजमध्ये एकांकिका, नाट्य स्पर्धा सुरू होत्या. दरम्यान नाटक लिहिणे आणि दिग्दर्शन करणे त्यांना प्रचंड आवडू लागले. दिग्दर्शन करत असताना मी खूप कडक शिस्तीचा आहे असा गैरसमज सर्वदूर पसरू लागला. त्यामुळे बहुतेकदा चांगल्या भूमिकेपासून, चांगल्या कामापासून मला वंचित राहावे लागले. आई थोर तुझे उपकारच्या वेळी मी दिग्दर्शकाच्या कानाखाली वाजवली अशी अफवा पसरवली गेली होती. त्यामुळे माझी या इंडस्ट्रीत एक वेगळी इमेज बनली. मी गॉसिप जास्त करत नाही आणि कुठल्या ग्रुपशीही मी जास्त जोडलेला नाही. त्यामुळेही कदाचित माझं नाव सुचवण्यात येत नसे.
माझे कुठल्या प्रोजेक्टसाठी नाव सुचवले तर ‘तो अर्ध्यातून काम सोडेल, त्याला भयंकर राग येतो’ अशा अफवा पसरवल्या जाऊ लागल्या. मग कित्येक दिवस नव्हे तर महिनो नमहिने माझ्याकडे कुठलेच काम येत नसे. अगदी उत्कृष्ट दिग्दर्शन आणि अभिनयाची पारितोषिक मिळवूनही माझ्याकडे पुढे काहीच काम नसायचे. शाळेत असताना परीक्षेत गाईड घेऊन उत्तरं लिहिणे, संस्कृतच्या तासाला बाईंकडून वर्गाबाहेर बसवणे. शिक्षक दिनाच्या दिवशी शिपाई बनवल्याने अर्धा तास अगोदर शाळेची घंटा वाजवणे असे प्रताप केले होते. त्यामुळे शाळेतून बाहेर पडल्यावर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेत बोलवावे अशी त्यांची खूप ईच्छा होती. त्यावेळी लाईफ मेम्बर ही सीरिअल प्रचंड गाजली आणि याचमुळे शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
जरा हाटके
सर्व माहिती मिळेल