आई कुठे काय करते या मालिकेत आपल्या आईच्या कायम पाठीशी उभा असलेला यश प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ही भूमिका अभिषेक देशमुख याने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने चांगलीच वठवलेली आहे. यश आणि गौरीचे लग्न व्हावे अशी ईच्छा मालिकेच्या प्रेक्षकांची आहे. मात्र आता गौरी परदेशातून पुन्हा यशला भेटायला येणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना सतावत आहे. दरम्यान अरुंधती आता लवकरच दुसऱ्या लग्नाच्या तयारीला लागणार आहे. मात्र तिला कांचनकडून परवानगी मिळणार का? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.
तूर्तास मालिकेतील यश म्हणजेच अभिषेकचे रिअल लाईफ बाबा आता अभिनय क्षेत्रात येऊन टीव्ही मध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिषेक त्याची पत्नी कृतिका देव आणि बहीण अमृता देशमुख हे सर्व कलाकार मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले आहेत. कलेचा वारसा त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाला असे म्हणायला हरकत नाही. कारण अभिषेक आणि अमृताचे बाबा सतीश देशमुख यांना देखील या क्षेत्राची आवड आहे. हौशी नाटकातून त्यांनी काम केले असल्यामुळे आपली दोन्ही मुलं कला क्षेत्रात आली तरी त्यांची काहीच हरकत नव्हती. आज त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि सुनेने देखील मालिका चित्रपट क्षेत्रात यश मिळवलं आहे. मात्र आता अभिषेकचे वडील सतीश देशमुख यांनी नुकतीच एक जाहिरात करून टीव्ही माध्यमातून एन्ट्री केलेली पाहायला मिळते.
वृद्धांची काळजी घेणाऱ्या YODDA या खाजगी कंपनीच्या जाहिरातीसाठी सतीश देशमुख यांनी काम केले आहे. सदर जाहिरातीचे दिग्दर्शन अनुप देशपांडे यांचे आहे. व्यावसायिक जाहिरातीतला हा पहिला अनुभव सतीश देशमुख यांना भारावून टाकणारा ठरला आहे. आपल्या बाबांची जाहिरात क्षेत्रातील एन्ट्रीवर अभिषेकने त्यांच्या अभिनयाचं कौतुक करणारी स्टोरी लिहिली. हे पाहून अभिषेकच्या बाबांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला अभिनयाची संधी मिळाल्याचे त्यांना खूप समाधान आहे. सतीश देशमुख हे उत्तम अभिनेते तर आहेच पण ते उत्कृष्ट कविता सुद्धा करतात हे बहुतेकांना माहीत नाही. व्यावसायिक जाहिरात क्षेत्रातील या पदार्पणाबद्दल सतीश देशमुख यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.