रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख आपल्या वेड चित्रपटाच्या प्रमिशनसाठी ठिकठिकाणी मुलाखती देत आहेत. या मुलाखतीमधून जेनेलिया आणि रितेशच्या अनेक खाजगी गोष्टींबद्दल देखील विचारण्यात येते. नुकतेच मधुराज रेसिपीजच्या मधुरा बाचल यांच्या किचनमध्ये देखील जेनेलियाने हजेरी लावली होती. सगळ्यांना उत्सुकता होती की जेनेलिया आपल्या मुलांना डब्यात काय देते. हे जाणून घेण्यासाठी मधुराने जेनेलियाला हा प्रश्न विचारला. जेनेलिया म्हणाली की,आमची दोन्ही मुलं वेगन आहेत. मुलांना प्राणिजन्य पदार्थ वगळून सात्विक आहार देण्यात येतो.
नाचणीचे पापड, स्नॅक्स आणि पोळीभाजी, कधीकधी पास्ता तर कधी पिझ्झा असंही त्यांच्या आवडीनुसार डब्यात द्यावं लागतं. शेंगदाण्याची चटणी आणि पिठलं भाकरी हे सुद्धा आमच्या जेवणात तुम्हाला पाहायला मिळेल. रितेश आपल्या आईला मुलांना एकेरी नावाने कधीच हाक मारत नाही, हे तुम्ही देखील अनुभवलं असेल. त्यामागचा आदर, सन्मान त्याने राखून ठेवलेला आहे. रितेश आणि जेनेलिया जेव्हा कधी कॅमेऱ्यासमोर येतात तेव्हा ते अगदी दिलखुलासपणे मीडियाला पोज देताना दिसतात. रीयान आणि राहील दोन्ही मुलं कॅमेऱ्यासमोर आले की लगेच आपले हात जोडतात. बॉलिवूड सृष्टीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींची मुलं मात्र असे कधीच करत नाहीत. उलट काजोलचा मुलगा आणि करीनाचा तैमुर याला अपवाद म्हणावी लागतील.
दोन्ही मुलं कॅमेरा दिसताच अतिशय उद्धटपणे वागताना दिसली आहे. तैमुर खूप उद्धट मुलगा आहे, मिडियासमोर सगळ्यांना कॅमेरा बंद करायला लावतो अशी चर्चा नेहमीच पाहायला मिळते. बॉलिवूड स्टार किड्सच्या तुलनेत रितेशची मुलं कायम संस्कारी वागत आहेत. रितेशला यामागचे कारण विचारण्यात आले, त्यावेळी त्याने असे करण्यामागे एक कारण सांगितले. रितेश म्हणतो की, मी माझ्या मुलांना सांगून ठेवलेलं आहे. तुमचे आईबाबा जे काम करतात त्यासाठी लोक तुमचे फोटो काढत असतात. तुम्ही आमची मुलं आहात म्हणून ते तुमचे फोटो काढतात. पण त्यांनी तुमचे फोटो काढावेत असं तुम्ही अजून काहीच केलेलं नाही, तरीही तुमचे फोटो काढतात. म्हणून तुम्ही त्यांचे हात जोडून आभार मानायला हवेत.