महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठी वरील कार्यक्रम गेली पाच वर्षे प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करत आहे. या पाच वर्षात महाराष्ट्रातील हास्यजत्रेच्या कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. काही दिवसांपूर्वीच या शोने एक ब्रेक घेतला होता. ब्रेकमध्ये पहिल्यांदाच कलाकारांनी परदेशात जाऊन लाईव्ह परफॉर्मन्स सादर केला, त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवाली परब, गौरव मोरे, दत्तू मोरे, पृथ्वीक प्रताप, प्रियदर्शनी इंदलकर या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
महाराष्ट्राची हास्यजत्रा शोने जसे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले तसेच या कलाकारांनाही चांगले मानधन मिळवून दिले.शोचा प्रत्येक कलाकार महिन्याला ७० ते ८० हजारांचे मानधन मिळवत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या शोने कलाकारांना आर्थिक सृष्ट्या चांगले स्थिरस्थावर केलेले आहे. याचाच परिणाम म्हणून आता ही कलाकार मंडळी स्वतःच्या पायावर उभे राहून विशेष खरेदी करताना दिसत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये प्रियदर्शनी इंदलकर हिने प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवली आहे. भिवाली हे तिचं कॅरॅक्टर तर हिंदी भाषिक प्रेक्षकांनाही विशेष स्मरणात राहिलं आहे. खरं तर प्रियदर्शनी ही बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात दाखल झाली होती. कॉलेजमध्ये असताना तिने एकांकिका केल्या होत्या.
फुलराणी, सोयरीक, भाऊबली, ट्रीपल सिट, लव्ह यु जिंदगी, डॉ काशिनाथ घाणेकर अशा चित्रपट मालिकेतून ती झळकली. फुलराणी हा तिचा प्रमुख भूमिका असलेला चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नृत्याचे प्रशिक्षण घेतलेल्या प्रियदर्शनीने अनेक रिऍलिटी शोमध्ये सहभाग दर्शविला होता. त्यामुळे गेली अनेक वर्षे ती इंडस्ट्रीत पाय रोवून आहे. यातूनच तिने आता तिच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून स्वतःला एक कार भेट केली आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रियदर्शनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तेव्हा तिने स्वतःसाठी मारुती सुझुकी ब्रँडची Nexa ignis ही कार खरेदी केली. या गाडीची ऑन रोड प्राईस ८ ते ९ लाख रुपये आहे. प्रियदर्शनीच्या या यशस्वी वाटचालीसाठी चाहत्यांनी तसेच हास्यजत्रेच्या कलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत.