सिटी ऑफ ड्रीम्स या सिरीजमुळे प्रिया बापटच्या अभिनयाचं मोठं कौतुक केलं जात आहे. यानिमित्ताने प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. प्रिया बापट आणि उमेश यांचा प्रेमविवाह आहे. याबद्दलही दोघे भरभरून बोलताना दिसले. आभाळमाया या मालिकेत काम करत असताना दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले होते. दरम्यान प्रिया उमेशच्या एवढी प्रेमात पडली होती की तिने त्याची चक्क मुलाखतच घेतली होती. उमेशची मुलाखत घ्यायची या बहाण्याने प्रियाने उमेशकडे वेळ मागवला होता. तो एक दिवस भेटीचा ठरला त्यावेळी प्रियाने मुलाखत म्हणून त्याला एक दोन प्रश्न विचारले.

प्रियाने त्यानंतर मात्र वही आणि पेन बाजूला ठेऊन गप्पा सुरु केल्या. तेव्हा उमेशला तिच्याबद्दल शंका आली होती. पण कालांतराने वेळ घेऊन प्रियाला त्याने होकार कळवला होता. उमेश आणि प्रिया दोघेही एकाच क्षेत्रात असल्याने एकमेकांना समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. यश अपयश दोघांनाही येतं त्यात एकमेकांना साथ देण्याची तयारी असते. त्यामुळे चूक काय बरोबर काय या गोष्टींवर आम्ही बोलतो. एकमेकांच्या कामचं आम्ही कौतुक केलं तरी लगेचच पाय जमिनीवर असावेत म्हणून खालीही खेचतो असे ते म्हणतात. पुढे प्रिया ट्रोलिंगबद्दलही म्हणते की, मराठी अभिनेत्री जेव्हा हिंदी चित्रपटात काम करतात तेव्हा इंटिमेट सिनसाठी त्या येतात असं ट्रोल मला करण्यात आलं.

अगोदर मी ट्रोलिंगला उत्तर देत होते, मात्र आता तसं होत नाही. मराठी अभिनेत्रीच्या जागी दीपिका पदुकोण असते तर तिच्या कामाचा भाग म्हणून तिचं कौतुक होतं. दीपिकाच नाही तर इतर भाषिक चित्रपटातही इंटिमेट सीन्स असतात, त्यांना कधीच ट्रोल केलं जात नाही पण मराठी अभिनेत्रीने केलं की त्याची चर्चा होते. तो माझ्या कामाचाच भाग आहे असं म्हणून का नाही बघत. मी सिटी ऑफ ड्रीम्स केला त्यावेळी इंटिमेट सिन मुळे प्रचंड ट्रोल झाले. पण त्यानंतर मी ह्याच्या दोन सिरीज केल्या तेव्हा लोकांनी माझं कौतुक केलं. प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सचिन पिळगांवकर, एजाज खान, संदीप कुलकर्णी, फ्लोरा सैनी, उदय टिकेकर, क्रिश छाबरिया आणि सर्वांचा लाडका सिद्धार्थ चांदेकर सिटी ऑफ ड्रीम्स मध्ये मुख्य भूमिका करत आहेत.