चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना नुकतीच डॉक्टरेटची पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. ही पदवी बहाल करतानाचा एक खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नागराज मंजुळे यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. नागराज मंजुळे यांनी फँड्री, सैराट, पिस्तुल्या, नाळ आणि झुंड अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांचे चित्रपट हे वेगळ्या धाटणीचे मानले जातात त्यांच्या याच योगदानाबद्दल डी वाय पाटील विद्यापीठाने D. Litt ची पदवी देऊन त्यांना सन्मानित केले आहे. फँड्री या आगळ्या वेगळ्या चित्रपटाने प्रेक्षकांना त्यांनी विचार करायला भाग पाडले होते. तर नाळ चित्रपटातून चैत्याच्या मनाची घालमेल त्यांनी हेरलेली पाहायला मिळाली.
या चित्रपटातू नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणूनच नव्हे तर एक अभिनेता बनून प्रेक्षकांसमोर आले. सैराट हा त्यांनी प्रेक्षकांसमोर आणलेला चित्रपट सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता. याच चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यात आला. तर झुंड या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. झुंड चित्रपटाबद्दल आजही सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगलेली पाहायला मिळते. हा चित्रपट पाहून अनेक बॉलिवूड कलाकारांनी, दिग्दर्शकांनी नागराज मंजुळे यांचं कौतुक केलं आहे. तर हा चित्रपट ऑस्करसाठी जावा असाही विचार मांडण्यात आला. आपल्या बहुतेक चित्रपटातून नागराज मंजुळे यांनी वास्तवाचे दर्शन घडवून दिले आहे. नवख्या कलाकारांना देखील त्यांनी प्रसिद्धीच्या झोतात आणले आहे.
त्यामुळे एका वेगळ्या धाटणीचे आणि प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव कायम घेतले जाते. त्यांच्या याच कार्याची दखल डी वाय पाटील विद्यापीठाने घेतली आहे. एके काळी एमफिल करण्याची इच्छा असलेल्या नागराज मंजुळे यांनी पुणे विद्यापीठात अनेक चकरा मारणाल्या होत्या. परंतु आज ही डॉक्टरेटची पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या जवळच्या मित्रांनी नागराज यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे आता आपल्या नावाच्या अगोदर डॉक्टरेट पदवी मिरवताना आपले जीवन सार्थकी झाले असेच आता ते म्हणत असावेत. त्यामुळे आता इथून पुढे डॉ नागराज मंजुळे आहि त्यांना ओळख मिळणार आहे ही बाब त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच कौतुकास्पद असणार आहे.