मानसी नाईक हिने भार्गवी चिरमुले हिच्या युट्युब चॅनलवर नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ती घटस्फोटाबद्दलही भरभरून बोलली. मानसीचा दोनदा अपघात झाला या अपघातातून मला स्वामींनीच वाचवलं हे ते आवर्जून म्हणताना दिसली. प्रदीप खरेराने मला फसवलं त्याने माझा वापर करून घेतला. एवढंच नाही तर मी हा संसार वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र एका पॉइंटनंतर मी त्याला सोडून देण्याचा निर्णय घेतला असे ती या मुलाखतीत म्हणते. एक पत्नी, आई, वडील बनून मी त्याला सावरत होते.
पण ती ममता दाखवायला गेले की नवरा सुटतो तसंच माझ्याबाबतीत झालं. मी त्याला पॉकेटमनी सुद्धा देत होते. मराठी मुलाशी लग्न केलं नाही, मी पैशांसाठी लग्न केलं म्हणून लोकांनी मला ट्रोल केलं. पण खरं पाहिलं तर ते उलट घडत होतं, असे स्पष्टीकरण मानसी या मुलाखतीत देते. चंद्रमुखी या चित्रपटात चंद्राची भूमिका अगोदर मानसी नाईक साकारणार होती अशी एक कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. यावर मानसीने मौन सोडलं आहे. ती म्हणते की, चंद्रमुखी हा चित्रपट अगोदर सुबोध भावे दिग्दर्शित करणार होता. सुबोध ,मी आणि कादंबरीकार विश्वास पाटील आम्ही एकत्र बसलो होतो. त्यावेळी सुबोध माझ्याकडे पाहून तूच चंद्रमुखी असे म्हणाला होता. अर्थात चित्रपट साइन केल्यानंतरच तो चित्रपट तुमचा असतो. मी हा माझा चित्रपट आहे असे मुळीच म्हणाले नव्हते.
चित्रपटाचा दिग्दर्शक, निर्माता त्यानंतर बदलला. हा चित्रपट प्रसाद ओकने दिग्दर्शित केला. मी हे सगळं या मुलाखतीत फक्त बोलले होते. तर अमृताने त्याचा वेगळाच अर्थ काढला. तिला हे माहीत असूनही केवळ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तिने माझा वापर केला. मला तिने फोन करून खूप काही ऐकवलं. ती माझी सिनिअर होती, ही इंडस्ट्री एवढी छोटी आहे की एकमेकांना समजून घ्यायला हवं. पण तिने माझी खिल्ली उडवली. मी तिची मोठी फॅन होते पण आता तिने एक फॅन गमावली आहे. मी देणाऱ्यातली आहे. एखादा ड्रेस तुला आवडला तर मी लगेच देऊन टाकते. कारण माझ्यावर सगळे रंग खुलून दिसतात. असे म्हणत मानसीने या चर्चेवर आता मौन सोडत अमृताशी थेट पंगाच घेतला आहे.