Breaking News
Home / जरा हटके / जे तत्वज्ञान जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत असतां, ज्यामुळे तुम्ही घडतां.. त्याच संस्थेकडून मिळाला पुरस्कार
actress urmila nimbalkar
actress urmila nimbalkar

जे तत्वज्ञान जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत असतां, ज्यामुळे तुम्ही घडतां.. त्याच संस्थेकडून मिळाला पुरस्कार

​​अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने संगीत सम्राट या रियालिटी शोचे सूत्रसंचालन केले होते. दिया और बाती हम, मेरी आशिकी तुम से ही, एक तारा, दुहेरी अशा मालिका आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. उर्मिलाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनोलॉजीची पदवी प्राप्त केली आहे. ती नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवरून व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच उर्मिला नेहमीच व्हिडिओजच्या माध्यमातून चाहत्यांना मेकअप बद्दल, साडी नेसण्याबद्दल सजेशन देत असते. त्याचमुळे तिचे मार्गदर्शन करणारे हे व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात पाहिलेही जातात.

actress urmila nimbalkar
actress urmila nimbalkar

तिच्या या अमूल्य सेवेबद्दल माई पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराविषयी उर्मिलाने दिलेली प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावून सद्गुरु कार्यात हातभार लावणाऱ्या स्त्रियांना! अर्थातच या वर्षीचा अपवाद म्हणजे, पराक्रम गाजवणाऱ्या माझ्या वैभव निंबाळकर भावाला मिळालेला सन्मान! गृहिणी देखील आपल्या घराचा, मुलांचा उत्तम सांभाळ करुन तिच्या क्षेत्रात शिखरावर जाऊ शकते. म्हणून माझा, आईचा झालेला सन्मान मला सगळ्यात जास्त भावला. सद्गुरु सांगतात “एकटा माणूस सुखीही होऊ शकत नाही आणि यशस्वीही”. माझ्या यशात जन्मतः मिळालेल्या कुटुंबाबरोबर तेवढीच मला साथ दिलेलं माझं नविन कुटुंब गुमास्ते. आणि माझा पार्टनर सुकृतला रंगमंचावर बोलावून मी या पुरस्का​​राचा स्वीकार केला.

maai award urmila nimbalkar
maai award urmila nimbalkar

ज्या तत्वज्ञानामुळे मी घडले जीवनविद्या मिशन त्यांच्याकडूनच मिळालेली कौतुकाची थाप पुढे अजून जोमाने काम करायला उर्जा देणार आहे.​ ​याबद्दल पती सुकीर्त गुमस्ते म्हणतात, जे तत्वज्ञान जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत असतां, ज्यामुळे तुम्ही घडतां त्याच जीवनविद्या मिशन कडून मिळालेला प्रतिष्ठेचा माई पुरस्कार नक्कीच खूप मोठी उर्जा देतो. खरंतर हा पुरस्कार उर्मिलाला तिच्या यूट्यूब कामगिरीविषयी मिळाला. पण तिने तो माझ्याबरोबरच स्विकारणार असं सांगून मला वेगळाच सुखद धक्का दिला.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.