Breaking News
Home / मराठी तडका / खूप दिवसांनी या कलाकाराला पाहून सेलिब्रिटींनी दिल्या प्रतिक्रिया
leena bhagwat mangesh kadam
leena bhagwat mangesh kadam

खूप दिवसांनी या कलाकाराला पाहून सेलिब्रिटींनी दिल्या प्रतिक्रिया

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी समोर आल्याचे पाहून त्यांचे चाहते नेहमीच खूश होतात. ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे, अनुपमा धारकर या देखील कधीकाळी नाव लौकिक मिळवलेल्या अभिनेत्री सोशल मीडियावरून समोर आलेल्या पाहायला मिळाल्या. तेव्हा प्रेक्षकांनीच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनेत्री लीना भागवत यांनी नुकतेच ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांची भेट घेतली आहे. या भेटीचे एक खास कारण देखील आहे. मात्र त्यांनी ते सध्या तरी गुलदस्यात ठेवणे पसंत केले आहे. मराठी नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेते मंगेश कदम आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच लीना भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच नवीन घरात गृहप्रवेश केला होता.

leena bhagwat mangesh kadam
leena bhagwat mangesh kadam

त्यांच्या आनंदात आता आणखी एक भर पडलेली पाहायला मिळणार आहे. लीना आणि मंगेश कदम हे दोघेही सध्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून एकत्रित झळकत आहेत. या मालिकेसोबतच ते आमने सामने या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिग्दर्शिका सई परांजपे यांना नाटकाच्या प्रयोगाला आमंत्रित केले होते. नाटक संपल्यावर सई परांजपे यांनी नाटकाच्या टीमची भेट घेतली. नाटकातील सर्व कलावंत, नेपथ्य आणि लेखक निरज शिरवाईकर यांचं त्यांनी कौतुक केलं. या कौतुकात त्यांनी अभिप्राय दिला की, ‘मराठी रंगभूमी सुखरूप, नव्हे सुदृढ असल्याचा प्रसन्न प्रत्यय अलीकडे आमने सामने पाहताना आला.

sai paranjpe
sai paranjpe

अभिनयाचा एक्का मंगेश कदम त्याने नेहमीच्या सराईतपणे प्रेक्षकांना जिंकलं. लीना भागवत ही अभिनयाची चालती बोलती पाठशाळा आहे. तिची चौफेर दौड पाहून मी थक्क झाले. नीरज शिरवाईकरने माझ्या सख्खे शेजारी मध्ये नट आणि सहाय्यक म्हणून काम केलं होतं. आज इतक्या वर्षानंतर लेखक दिग्दर्शक म्हणून त्याची कामगिरी पाहून म्हणावंसं वाटतं नीरज, तू कानामागून आलास आणि तिखट झालास’. सई परांजपे यांनी दिलेल्या या अभिप्रायाबद्दल लीना भागवत यांनी त्यांचे आभार मानले. साधारण आठवड्याभरात सई मावशींनी आवर्जून पुण्याच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. ‘मला तुम्हाला भेट द्यायची आहे’.

पडत्या फळाची आज्ञा मानून लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी प्रयोग संपवून त्यांची भेट घेतली. ‘आणि ती भेट पाहून आम्हा दोघांना सुखद धक्काच बसला. आम्ही अक्षरशः हरखून गेलो.’ अशी छानशी प्रतिक्रियाच लिनाजींनी याबद्दल दिली. अर्थात ही भेट काय असेल? असा प्रश्न लिनाजींनी विचारताच, त्यांच्या आगामी नाटकाची घोषणा असावी असा अंदाज त्यांच्या चाहत्यांनी प्रतिक्रियेतून व्यक्त केला आहे. यासोबतच इतक्या वर्षांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सई परांजपेना पाहून अनेकांनी छानशा प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहेत.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.