Breaking News
Home / जरा हटके / मराठी सृष्टीतील अभिनेत्रीने वयाच्या ४८ व्या वर्षी घरानंतर घेतली महागडी गाडी
mangesh kadam leena bhagwat
mangesh kadam leena bhagwat

मराठी सृष्टीतील अभिनेत्रीने वयाच्या ४८ व्या वर्षी घरानंतर घेतली महागडी गाडी

मराठी सृष्टीला असे अनेक कलाकार लाभलेले आहेत, ज्यांचा साधेपणा आणि मनमिळावू वृत्ती त्यांच्या अभिण्यातूनच प्रेक्षकांना जाणवते. मराठी सृष्टीत देखील अशी एक अभिनेत्री आहे जीच्यासोबत काम करताना कुठल्याही कलाकाराला संकोच वाटत नाही. लीना भागवत यांनी सहजसुंदर अभिनयाने असा ठसा उमटवून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा तयार केली आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट, होणार सून मी ह्या घरची या मालिका असो किंवा; आताच्या घडीची ठिपक्यांची रांगोळी या मालिकांमधून लीना यांचा दिलखुलासपणा प्रेक्षकांना विशेष भावला. लीना भागवत आणि मंगेश कदम ह्या दोघा दाम्पत्यांनी मालिका, नाटकातून एकत्रित काम केले आहे.

mangesh kadam leena bhagwat
mangesh kadam leena bhagwat

संसाराचा गाडा चालवत असताना अनेक चढउतार त्यांनी अनुभवले आहेत. या अनुभवातून पुढे जात त्यांनी यशाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. काही महिन्यांपूर्वीच लीना आणि मंगेश कदम यांनी मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर घेतलं होतं. वयाच्या ४८ व्या वर्षी आपलं एक स्वप्न सत्यात उतरत असल्याचा आनंद विरळाच असतो हे त्यांनी अनुभवलं होतं. आता या दाम्पत्यांनी आणखी एक आनंदाची बातमी शेअर केलेली दिसत आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर लीना आणि मंगेश कदम यांच्या घरी चार चाकी वाहनाने प्रवेश केलेला आहे. महिंद्राची एक्सयूव्ही ७०० ही तब्ब्ल १७ लाख किमतीची गाडी त्यांनी खरेदी करून आपला आनंद द्विगुणित केला आहे.

sai paranjpe leena bhagwat
sai paranjpe leena bhagwat

मराठी सेलिब्रिटींनी; तमाम चाहत्यांनी दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हे दोघेही सध्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत एकत्रित झळकत आहेत. सोबतच आमने सामने या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिग्दर्शिका सई परांजपे यांना नाटकाच्या प्रयोगाला आमंत्रित केले. नाटक संपल्यावर सई परांजपे यांनी नाटकाच्या टीमची भेट घेत आणखी एक नवा प्रोजेक्ट करण्याच्या तयारीत आहेत. अतिशय साधे राहणीमान, सोज्वळ, हसमुख चेहऱ्याच्या लीना यांनी जवळपास तीन दशकं मराठी सृष्टीत काम केलं. १९९६ साली अधांतर हे पहिलं व्यवसायिक नाटक साकारलं होतं. हाच खेळ उद्या पुन्हा या नाटकामुळे दिग्दर्शक अभिनेते मंगेश कदम सोबत चांगली ओळख झाली.

मंगेश कदम यांनी लीना यांना प्रपोज केले होते; परंतु त्यांनी नकार दिला होता. एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत काम करत असताना एक दिवस सुट्टी काढून प्रेमविवाह केला. अर्थात मंगेश कदम हेही अतिशय साधे व्यक्तिमत्व असल्याने लीनाजींना ५ रुपयांचा पार्लेजी बिस्कीट पुडा देऊन प्रपोज केले होते. ही गोड आठवण लीना भागवत यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. स्वभावात साधेपणा असला तरी अभिनयाच्या बाबतीत मात्र ते कुठेही कमी पडलेले पाहायला मिळत नाहीत. चित्रपट, मालिका, नाटक अशा प्रवासात दोघांनी आपल्या हक्काचं घर आणि कार खरेदी केली आहे. आयुष्याच्या या नवीन सुरुवातीला लीना भागवत आणि मंगेश कदम यांचे खूप खूप अभिनंदन.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.