समीर वानखेडे यांनी अवधूत गुप्तेच्या खुपते तिथे गुप्ते या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये आता राजकारण्यां व्यतीरिक्त मराठी सृष्टीतील सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात येत आहे. पुढच्या भागात अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अवधूत बोलतं करणार आहे. या आठवड्यातील समीर वानखेडे यांची दमदार मुलाखत खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेली पाहायला मिळाली. आपल्या देशातील तरुण पिढी वाया जाऊ नये आणि देशातला पैसा योग्य ठिकाणी वापरला जावा अशी ईच्छा त्यांनी बोलून दाखवली.
शाहरुख, सलमान हे माझ्यासाठी सेलिब्रिटी नसून बाबासाहेब आंबेडकर, सिंधुताई सपकाळ हे माझ्यासाठी खरे सेलिब्रिटी आहेत असे ते मानतात. समीर वानखेडे यांनी अभिनेत्री क्रांती रेडकर सोबत लग्न केले. हे लग्न कसं जुळलं, तुम्ही क्रांतीला कुठे शोधलं? हा प्रश्न अवधुतने त्यांना विचारला. तेव्हा समीर वानखेडे यांनी आपल्या मनातली प्रेमाची गोष्ट पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर उघड केली. लोक मला बोलतात की मी अमुक अमुक लोकांना पकडतो आणि माझी पत्नी एक चित्रपट अभिनेत्री आहे असे बोलतात. पण लोकांना माहीत नाही की मी आणि क्रांती आमच्या दोघांची खूप जुनी मैत्री आहे. आम्ही दोघेही रुईया कॉलेजमध्ये शिकायला होतो. तेव्हापासून तिला मी आवडत होतो त्यानंतर आम्ही लग्न केलं.
क्रांतीला तुम्ही प्रपोज केलं नाही का? असा अवधुतने पुन्हा एक प्रश्न केला. तेव्हा समीर वानखेडे म्हणतात की, मी तिला प्रपोज नाही केलं, कारण इगो आड आला. पण मलाही ती आवडत होती, शेवटी तिनेच मला लग्नाचं विचारलं. पण मलाही तिच्यासोबत लग्न करायचं होतं. असे म्हणत समीर वानखेडे यांनी पहिल्यांदाच क्रांती सोबतच्या प्रेमाची कबुली दिली. क्रांती रेडकर ही अनेकदा सोशल मीडियावर मजेशीर आणि तितकेच अर्थपूर्ण व्हिडीओ शेअरकरत असते. समीर वानखेडे सरकारी अधिकारी असल्याने त्यांचे वागणे हे कायम शिस्तीचे असते. क्रांतीच्या मजेशीर व्हिडिओवर समीर वानखेडे अनेकदा शांत प्रतिसाद देत असतात. कित्येकदा तर ते व्हिडिओला नकारही देतात. पण क्रांती यावर शांत बसणार नाही हेही त्यांना ठाऊक असतेच.