Breaking News
Home / जरा हटके / “वय झालं की माणसाला खूप त्रास होतो”.. ज्येष्ठ अभिनेते मनोहर माहिमकर यांची वृद्धापकाळातली खंत
mahimkar kaka ankita walawalkar
mahimkar kaka ankita walawalkar

“वय झालं की माणसाला खूप त्रास होतो”.. ज्येष्ठ अभिनेते मनोहर माहिमकर यांची वृद्धापकाळातली खंत

ज्येष्ठ अभिनेते मनोहर माहिमकर हे काम मिळावे म्हणून सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर अंकिता वालावलकर हिला भेटले होते. अंकिता गिरगावात शुटिंगनिमित्त गेली होती तिथेच तिची माहिमकर काकांशी भेट घडून आली. त्यावेळी अंकिताने तिच्या चालू असलेल्या प्रोजेक्टमध्ये त्यांना काम देऊ केले. या कामासाठी माहिमकर लगेचच तयार झाले. काम आटोपल्यावर ते अंकिताकडे आले आणि मुली मला पुढे काम देशील का? अशी विनंती त्यांनी केली. मला पैसे नकोयेत तर काम हवंय. माझं लग्न झालेले नाही त्यामुळे वेळ जात नाही. कामाची गरज आहे असे म्हणत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते.

social media star ankita walawalkar
social media star ankita walawalkar

तेव्हा अंकिताने त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. मीडिया माध्यमातून सुद्धा ही बातमी वेगाने पसरली जेणेकरून माहिमकर काकांना कुठेतरी काम मिळेल. मनोहर माहिमकर हे गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात छोटी छोट्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांनी हिंदी मराठी अशा माध्यमातून काम केलेलं आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून काम मिळत नसल्याने ते हताश झाले होते. एक आशेचा किरण म्हणून त्यांनी अंकिताची भेट घेतली होती. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन दिवसांनी अंकिताने पुन्हा एकदा मनोहर माहिमकर यांच्या घरी जाऊन भेट घेतली. माहिमकर काकांनी त्यांच्या कारकिर्दीचा आढावा देणारे वृत्तपत्रांची कात्रणे दाखवली. सोबतच जुन्या आठवणींना उजाळा दिला.

ankita and mahimkar kaka
ankita and mahimkar kaka

इच्छा मरणाचा अर्ज देखील दाखवला. पण असा अर्ज करायचा नाही अशी तंबी तिने काकांना दिली. यावेळी अंकिताने लग्नाचा विषय काढला. ‘तुम्ही मला सांगा की मी लग्न करू की नको? म्हणजे लग्न करावं की नाही?’ असा तिने प्रश्न विचारताच माहिमकर काका मिश्कीलपणे हसतात. आणि म्हणतात की, ‘लग्न केलंच पाहिजे. आता तुम्हाला त्याचं काही वाटत नाही पण नंतर वय झालं की खूप त्रास होतो. म्हणजे आजारपण असतं. आता आपण खूप मजा करतो पण पुढे माणसाला आजारपण येतं. आधारासाठी म्हणून लग्न करायला पाहिजे’ असे ते यावेळी म्हणताना दिसले. रडायचं नाही आता लढायचं असे म्हणत मनोहर माहिमकर यांना काम मिळावे म्हणून अंकिता सतत प्रयत्न करत आहे. त्यांना काम नक्की मिळणार असे ती त्यांना आश्वस्त करते.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.