Breaking News
Home / जरा हटके / असा साजरा झाला हेमांगी कविचा व्हॅलेन्टाईन आणि साखरपुडा.. पहिल्या गिफ्टची गोष्ट
hemangi kavi valentine life partner
hemangi kavi valentine life partner

असा साजरा झाला हेमांगी कविचा व्हॅलेन्टाईन आणि साखरपुडा.. पहिल्या गिफ्टची गोष्ट

हेमांगी कवी तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेच पण तिच्या लिखाणाचे सुद्धा आता अनेकजण चाहते झालेले आहेत. सेटवरील टॉयलेटच्या असुविधांवर परखडपणे मत व्यक्त करणारी हेमांगी, ताज हॉटेलचा पहिला अनुभव घेणारी हेमांगी आणि बाई बुब्स आणि ब्रा वरून चर्चेत राहिलेली हेमांगी तिच्या लिखाणातून नेहमीच परखड आणि तेवढीच आत्मविश्वासू वाटली आहे. जेजे स्कुल ऑफ आर्ट मधून कलेचे शिक्षण घेत असतानाच हेमांगीला अभिनयाची ओढ लागली. नाटक, एकांकिका, मालिका आणि चित्रपट अशा क्षेत्रात ती सहजतेने वावरली आहे. प्रमुख भूमिका, विरोधी भूमिका ते सहाय्यक अभिनेत्री असा तिचा हा प्रवास उल्लेखनीय कामगिरी करणारा ठरला आहे.

hemangi kavi valentine life partner
hemangi kavi valentine life partner

हेमांगीच्या पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आज व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधून प्रथमच तिने आपल्या प्रेमाची गोष्ट इथे शेअर केली आहे. हेमांगीचा प्रेमविवाह आहे मात्र व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी आपल्या नवऱ्याने पहिल्यांदा प्रपोज कसे केले त्यावेळची एक खास गोष्ट सांगताना ती म्हणते की, हे माझं पहीलं Valentine gift. १४ फेब्रुवारी २००७! मुलुंडच्या Pizza Hut मध्ये साजरा केला होता पहिला वहीला valentine day. आयुष्यात पहिल्यांदा Pizza खाल्ला होता. नाही, त्याने खाऊ घातला होता. हीच माझी त्यादिवशीची propose ring होती आणि पुढे जाऊन हीच माझी engagement ring ही झाली. खरंतर Propose तर करून झालं होतं. मी हो ही म्हणून झालं होतं. पण साखरपुड्याची अंगठी म्हणून मी हीच घालणार हे आधीच सांगितलं होतं.

hemangi kavi husband
hemangi kavi husband

लग्नाच्या आधी साखरपुडा करायचाच असतो म्हणून लग्नाच्या काही तासांपुर्वी साखरपुड्याचे कपडे घालून एकमेकांना अंगठी घालण्याची विधीपुर्वक औपचारिक्ता पार पाडली. कशाला हवी उगाच दुसरी अंगठी! अशी समजूतदार बायको मिळायला भाग्यच लागतं हो. तेव्हा बोटात असलेली तीच अंगठी काढून एका नव्या feeling सह माझ्या होणाऱ्या नवऱ्याने पुन्हा माझ्या बोटात घातली. मी त्याला त्याच्यासाठी बनवलेली अंगठी घातली आणि झाला आमचा साखरपुडा! तेव्हापासून आजतागायत ही माझ्या बोटात आहे. आम्ही एकमेकांना उगाचच काहीही gift करत नाही कामाच्याच गोष्टी gift करतो. दिवस ही साजरा होतो, गरज ही भागते आणि आठवण ही राहते. आजही आम्ही असच काहीतरी खरेदी करणार आहोत, तुम्हीही करा! Happy Valentine’s Day from us to you! प्रेम दिनाच्या सर्वांना प्रेममय शुभेच्छा!

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.