Breaking News
Home / जरा हटके / एक नवीन प्रवासाची सुरुवात, म्हणत अभिनेत्याने शेअर केले लग्नाचे फोटो
harish dudhade marriage

एक नवीन प्रवासाची सुरुवात, म्हणत अभिनेत्याने शेअर केले लग्नाचे फोटो

सध्या सगळीकडे लग्नाचा सिजन सुरू झालेला आहे. मराठी सेलिब्रिटी विश्वात देखील लग्नाची धामधूम पाहायला मिळते आहे. वर्षाच्या अखेरीस मराठी सृष्टीत अनेक कलाकार मंडळी विवाहबद्ध होताना दिसत आहेत. हार्दिक जोशी अक्षया देवधर यांचे लग्न खूप गाजलेले दिसले. अशातच काल तीन कलाकारांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात केलेली पाहायला मिळते आहे. अभिनेता सुमित पुसावळे आणि मोनिका महाजन यांनी काल १४ डिसेंबर रोजी मोठ्या थाटात लग्न केले. तर शेवंता म्हणजेच रात्रीस खेळ चाले मालिकेतील अभिनेत्री कृतिका तुळसकर हिने दिग्दर्शक विशाल देवरुखकर सोबत लग्नगाठ बांधली.

harish dudhade marriage
harish dudhade marriage

प्रसिद्ध अभिनेता हरीश दुधाडे याने देखील मोठ्या थाटात लग्न केले असल्याचे समोर आले आहे. काल १४ डिसेंबर २०२२ रोजी अभिनेता हरीश दुधाडे आणि समृद्धी निकम यांनी मोठ्या थाटात लग्न केलेले आहे. लोणावळा येथे फरीयास रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला आहे. लग्नाच्या एक दिवस अगोदर हरीश आणि समृद्धी यांनी याच ठिकाणी एंगेजमेंट केली होती. त्यानंतर त्यांचा हळदीचा आणि संगीत सोहळा रंगलेला दिसला. अभिनेता अंकित मोहनने या सोहळ्याला हजेरी लावून हरीश आणि समृद्धीच्या एंगेजमेंटचे फोटो शेअर केले होते. त्यावरून हरीश विवाहबंधनात अडकतोय अशी माहिती मिळाली होती. काल याच ठिकाणी या दोघांचा मोठ्या थाटात लग्नाचा सोहळा पार पडला.

harish dudhade samruddhi nikam
harish dudhade samruddhi nikam

अभिनंदन मीस्टर अँड मिसेस बहिर्जी हर हर महादेव असे कॅप्शन देत अंकितने या दोघांना नवीन प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. हरीश दुधाडे सध्या तुमची मुलगी काय करते या मालिकेत इन्स्पेक्टर विजय भोसलेची भूमिका साकारत आहे. यासोबतच तो आता काळी राणी या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नकळत सारे घडले या मालिकेतून हरिशचा मराठी मालिका सृष्टीतला प्रवास सुरू झाला होता. सरस्वती, तुमची मुलगी काय करते अशा मालिकांमधून त्याला महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या. हरिशला ऐतिहासिक चित्रपटातून अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली. फत्तेशीकस्त, फर्जंद, पावनखिंड आणि आता शिवप्रताप गरुडझेप अशा चित्रपटात तो बहिर्जी नाईक, रामसिंह अशा महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे.

मालिका, चित्रपट आणि आता नाटकातून तो नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला आहे. हरीशची पत्नी समृद्धी निकम ही अभिनय क्षेत्राशी निगडित नसली तरी तिला मॉडेलिंगची आवड आहे. हे दोघेही मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील असल्याने त्यांचे हे अरेंज मॅरेज असल्याचे बोलले जात आहे. एक नवीन सुरुवात असे म्हणत हरिशने लग्नसोहळ्यातील पत्नी सोबतचा एक खास फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याच्या या फोटोवर सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

One comment

  1. U should make a excel sheet of who is marrying whom, what’s there status etc.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.