अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद सध्या अभिनय क्षेत्रात सक्रिय नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे.आपल्या कारकीर्दित त्यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत परंतु गेल्या काही वर्षांपासून त्या राजकारणात आपले नशिब अजमावताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यात त्यांनी निवडणूक देखील लढवली होती त्यावेळी त्या प्रसार माध्यमातून लोकांसमोर येत राहिल्या होत्या. नगर जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या अनेक समस्यांना त्यांनी हात घातला असून आजही समाजउपयोगी कार्यांचा पाठपुरावा त्या सतत करताना दिसत आहेत.
मधल्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन त्यांनी मदतीचा हात पुढे करून अनेक मुलींची लग्न करून देण्याचे जाहीर केले होते. याच अनुषंगाने आज त्यांनी पुन्हा एकदा असाच मदतीचा एक हात पुढे केलेला पाहायला मिळतो आहे. आपल्या चॅरिटी मार्फत त्यांनी महा’मारी संकटात आलेल्या अडचणींचे निवारण व्हावे म्हणून एक घोषणा केली आहे. या चॅरिटी मार्फत संपुर्ण महाराष्ट्रात त्यांनी हेल्पलाईन सेंटर उभाण्यात आली असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात २८०० प्रतिनिधी तर प्रत्येक जिल्ह्यात १०० प्रतिनिधी हेल्पलाईनचे काम पाहण्यासाठी रुजू केले असल्याचे सांगितले आहे. जाहीर केलेल्या मदतीमध्ये पेशंटला बेड मिळवून देणे, ऑक्सिजन बेड मिळवून देणे शिवाय कोणते हॉस्पिटल जास्त बिल आकारणी करेल किंवा स्वच्छता पुरवत नसेल तर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. नागरिकांसाठी हे मदत केंद्र उभारल्याने यातून अनेकांना फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. सामान्यांच्या या समस्या जाणून घेऊनच तिने हे पाऊल उचलून मोठे धाडस केले आहे. त्यासाठी दिपालीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
जर तुम्हाला नवनवीन कलाकारांविषयी जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तसेच आम्हाला पत्रे देखील लिहू शकता. आमची टीम जास्तीत जास्त मागणी आलेल्या चाहत्यांना प्राधान्य देईल. आमच्याबरोबर जोडलेले रहा आणि आमच्या फेसबुक पेज वर देखील आपल्या आवडत्या नायक नायिकांसाठी लाईक, फॉलो आणि शेअर करा.