नो एन्ट्री पुढे धोका आहे, बोल बेबी बोल, पोश्टर गर्ल, पोश्टर बॉईज या आणि अशा अनेक चित्रपटातून महत्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर नुकताच पुण्यातील पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत विश्वासरावची पत्नी स्नेहा चव्हाण हिने घरगुती हिंसाचार, मारहाण तसेच मानसिक आणि शारीरिक छळ यामुळे अनिकेत विश्वासराव याच्यावर कोथरूड पोलीस चौकीत जाऊन गुन्हा नोंदवला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि त्याची पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांनी २०१८ साली लग्न केले होते.
लग्नानंतर काही काळातच अनिकेतने पत्नी स्नेहाला मानसिक छळ करण्यास सुरुवात केली एवढेच नाही तर पाहुण्यांसमोर देखील तो तिला कमी लेखत असे. आपली पत्नी आपल्या पेक्षा वरचढ ठरायला नको आपल्या पेक्षा लोकप्रिय ठरायला नको या हेतूने तो तिला कायम कमी लेखत असे, लोकांसमोर तो तिला अपमानास्पद वागणूक देत असे. मारहाण देखील केली होती. मारहाण करताना त्याने तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता असे स्नेहाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अनिकेत विश्वासराव हा मुंबईतच वास्तव्यास आहे मुंबईतील दहिसर येथी विश्वासराव रेसिडेंसीमध्ये हे कुटुंब राहत होते. ह्या सर्व घटना ह्याच ठिकाणी घडल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान आपली पत्नी चित्रपट सृष्टीत पुढे जाऊ नये या हेतूने अनिकेत स्नेहवर दबाव आणून तिची छळवणूक करत असे. डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ यादरम्यान माझी छळवणूक झाली असल्याचे स्नेहाने अनिकेत वर आरोप लावले आहेत. स्नेहा या काळात पुण्यात असलेल्या तिच्या माहेरी दाखल झाली आहे आणि तिने अनिकेत विरोधात तक्रार नोंदवली आहे. लग्नानंतर स्नेहा चव्हाण फारशी कोणत्या प्रोजेक्ट मध्ये दिसली नाही कदाचित हेच कारण तिच्या करिअरच्या आड येत असावे असा संशय तिच्या चाहत्यांना आहे.
दरम्यान मधल्या काळात या घटना घडत होत्या त्यामुळे हे दोघेही कधीही एकत्रित फारसे पाहायला मिळाले नाही. स्नेहाने लावलेल्या आरोपांना तिच्या सासू सासऱ्यांकडून दुजोरा मिळाला आहे. अनिकेत विश्वासराव स्नेहाचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता असेही त्यांनी आपल्या बाजूने म्हटले आहे. या प्रकरणी अनिकेत विश्वासराव आता मोठ्या अडचणीत सापडणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. त्यातून फेब्रुवारी २०२१ मध्ये स्नेहा या माहेरी पुण्यात परत आल्या. त्यानंतर आता त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.