मराठी सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयासोबतच आपल्या अंगी असलेल्या कलांचे दर्शन प्रेक्षकांसमोर आणताना दिसतात. बहुतेक अभिनेत्रींना पेंटिंग, चित्रकलेची आवड आहे. यात प्रामुख्याने प्रार्थना बेहरे हिचेही नाव घेण्यात येईल. काही दिवसांपूर्वी प्रार्थना बेहरेचे पेंटिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून विकले गेले त्यातून मिळणारी रक्कम तिने गरजू लोकांना दिली होती. तसेच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही देखील उत्तम चित्रकार आहे. तिने काढलेली चित्रं तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतील. या अभिनेत्रींसोबत हेमांगी कवी ही देखील उत्कृष्ट चित्रकार असल्याचे नुकतेच समोर आले आहे.
हेमांगी कवीच्या पोस्ट सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात पण तिच्यातील कलाकार नुकताच समोर आलेला दिसून येतो. दिवाळीचे औचित्य साधून हेमांगीने स्वतः काढलेल्या रांगोळ्या पोस्ट केल्या आहेत. तिच्या ह्या रांगोळ्या पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. रांगोळी सोबत तिने एक पोस्ट लिहिली आहे त्यात ती म्हणते की, शाळा, college ला असताना रांगोळी competition, exhibition मध्ये भाग घ्यायचा म्हणजे घ्यायचाच! दिवाळीच्या आधी तीन चार दिवस ह्या competitions, exhibitions सुरू व्हायच्या. काय ती excitement असायची. शाळेतून घरी आलं की जेवायचं, homework complete करायचा, आईला फराळ करायला मदत करायची आणि मग आठ साडे आठला exhibition hall ला हजर व्हायचं! रांगोळी चाळायची, रंग मिसळायचे, छटा तयार करायच्या, brown paper वर sketch काढायचं आणि मग सुरू! रात्री दीड दोन अडीच mood असे पर्यंत रांगोळी काढायची! रात्रीच्या जेवणाला फक्त घरी यायचं की पुन्हा hall वर. दोन तीन दिवसात रांगोळी पूर्ण व्हायची! मला तर वेगवेगळ्या ठिकाणाहून रांगोळी काढायला आमंत्रणं यायची! मी portraits साठी famous होते! अनेक पारितोषिके मिळवली. दिवाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी results announce व्हायचे..
आपल्याला पारितोषिक मिळालं की काय मग आठवडाभर आपल्या नावाची आणि talent ची सगळीकडे चर्चा असायची. काय भारी वाटायचं म्हणून सांगू! दिवाळीची सुट्टी संपून मग शाळेत गेल्यावर प्रत्येक वर्गात जाऊन आपली जिंकलेली awards दाखवायची, कौतुक व्हायचं! तो आनंद, ते झालेलं कौतुक, ते मिरवणं, shining मारणं… साला जगात याला तोड नाही! Oscar मिळाला तरी नाही! नंतर संस्कार भारतीचा class लावून मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या पण का कुणास ठाऊक मला आजही गेरू सारवून पारंपरिक पद्धतीने काढलेली छोटीशी ठिपक्यांची रांगोळीच जास्त आवडते! सोप्पी पण तेवढीच आकर्षक!…