Breaking News
Home / जरा हटके / अवधुतने सांगितली त्याला खुपणारी गोष्ट.. परिसरातील रहिवाशांनी वनखात्याकडे केली तक्रार
avdhoot gupte good morning
avdhoot gupte good morning

अवधुतने सांगितली त्याला खुपणारी गोष्ट.. परिसरातील रहिवाशांनी वनखात्याकडे केली तक्रार

मराठी इंडस्ट्रीत संगीतकार, गायक, तसेच सूत्रसंचालक अशी ओळख मिळवलेल्या अवधुतच्या घरची रोजची सकाळ ही माकड चेष्टेने होते. कारण अवधुतचे घर बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच वसलेलं आहे. घरात काहीतरी खायला मिळेल या उद्देशाने ही माकडं अवधुतच्या घरात हक्काने शिरतात. नुकताच त्याने असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात अवधुतची आई माकडांना घराबाहेर काढण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. आमची रोजची सकाळ ही अशी असते म्हणत अवधुतने यासंदर्भात एक विस्तृत पोस्ट लिहिली आहे. तो म्हणतो की, अहो गुप्ते, तुम्हाला काय खुपते?

avdhoot gupte story
avdhoot gupte story

तर सध्या आम्हाला दररोज सकाळी उठून बघायला मिळणारी एक “माकड चेष्टा” खुपते! व्हिडिओमध्ये दिसणारी ही माझी आई. हीचंच आम्ही दोन वर्षांपूर्वी लंग ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलंय. तर, तिच्या नाकावर टिच्चून घरात येऊन केळी पळवणारा.पळवणारा कुठला, तिथेच बसून खाणारा! आणि तिच्याच अंगावर धावून जाणारा हा हुप्प्या बघा! हा त्रास आमच्या बोरिवलीतल्या श्रीकृष्ण नगर मधल्या प्रत्येक रहिवाशाला आता असह्य झाला आहे! अनेकांनी वनखात्याकडे तक्रार देखील केली आहे. वनखाते देखील काही उपाययोजनांचा विचार नक्कीच करत असेल, ह्याची मला खात्री आहे. ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान‘ हे बाजूलाच असल्यामुळे, विविध पक्षी प्राण्यांच्या भेटी हे खरंतर आमच्या श्रीकृष्णनगरचे आभूषण.

avdhoot gupte traveller
avdhoot gupte traveller

आम्ही हे वर्षानुवर्षांपासून मिरवत देखील आलो आहोत. पण, माकडांचा त्रास हा कित्येक पटींनी वाढला आहे, हे मात्र खरं! आणि ह्याचं खरं कारण म्हणजे “त्याआधी वर्षानुवर्षे उद्यानात फिरायला गेलेल्या आपण सगळ्यांनी ह्याच माकडांना खायला दिलेली केळी, वडापाव, पॉपकॉर्न आणि लेज्!” ही माकडं पिढ्यान पिढ्यापासून आता ‘शंभर टक्केच्या वन्य जीवनाला‘ मुकली आहेत. झाडावर राहतात, तरी टाकीवरच्या पत्र्याखाली झोपतात. आमच्याच झाडावरच्या तुत्या, जाम, आंबे, पेरू वगैरे फळे काढून खातात सुद्धा. पण, ते केवळ हौसे खातर! बाकी सकाळी घरांच्या खिडक्यातून चपात्या लाटण्याचे आवाज आणि फोडण्यांचा वास सुटला, की खिडकीच्या जाळ्यांवर येऊन ओरडा आरडा करून हक्काने हे सर्व पदार्थ मागतात. माकडं यायची.

आधी सुद्धा यायची. पण, महिन्या दोन महिन्यातून चुकून भरकटत आलेली अशी.मागील काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना जायची परवानगी बंद झाली आणि त्याबरोबरच बंद झाला ह्या माकडांचा खुराक. मग ह्या वेळेस तो खुराक शोधत ती इथे आली आणि मग इथलीच झाली. आता ती इथेच राहतात आणि छळतात! बाकी स्ट्रगल चालूच राहील. फक्त ह्यापुढे तुम्ही कुठेही फिरायला गेलात आणि माकड दिसल्यावर त्यांना काही बाही खाऊ द्यायला तुमचा हात किंवा मुलं पुढे सरसावलीच. तर हा व्हिडिओ नक्की आठवा! एवढेच काय ते, शुभ दिवस!

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.