Breaking News
Home / जरा हटके / माझ्यासाठी रखुमाई बनून उभी रहा मुली.. मला काम हवंय!
ankita mahimkar kaka
ankita mahimkar kaka

माझ्यासाठी रखुमाई बनून उभी रहा मुली.. मला काम हवंय!

बऱ्याच कलाकारांकडे योग्यता असूनही काम मिळत नाही त्यावेळी त्यांना काम मिळवण्यासाठी विनवणी करावी लागते. अनेजण या प्रवासातून गेलेले आहेत काहींना यातून पर्यायी मार्ग मिळतात. मात्र वय झाल्यानंतर त्यांना छोट्या छोट्या भूमिका करण्याशिवाय गत्यंतर नसते. मराठी हिंदी मालिकेतून लहान भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मनोहर माहिमकर हे देखील काम मिळवण्यासाठी धडपडत आहेत. नुकतेच मनोहर माहिमकर यांनी कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिध्द असलेल्या अंकिता वालावलकर हिची भेट घेतली. अंकिताचे गिरगाव मध्ये शूट चालू होतं तिथे तिची माहिकर यांच्याशी भेट झाली.

manohar mahimkar kaka
manohar mahimkar kaka

अंकिता तुझ्याकडे काम असेल तर मला दे अशी त्यांनी विनंती केली. मनोहर माहिमकर यांचे वय ७४ आहे. त्यांचे लग्न न झाल्यामुळे वेळ घालवायला त्यांचं कुटुंब नाहीये. इच्छा मरणाची त्यांची इच्छा आहे मात्र या भारतात तसं ऍप्लिकेशन देता येत नाही. मात्र मला काम हवंय जेणेकरून माझा वेळ जाईल आणि मी त्यातून काहीतरी पैसे कमवू शकेल. मला नुसत्या पैशांची अजिबात मदत नकोय, मला कामाची गरज आहे. माझ्यासाठी तू रखुमाई बनून उभी रहा मुली, मला काम हवंय! असे त्यांनी अंकिताजवळ बोलून दाखवले.अंकिताने मनोहर माहिमकर यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांना कुठेतरी काम मिळावे म्हणून ती प्रयत्न सुद्धा करणार आहे. या इंडस्ट्रीत असणारे जेवढे लोक माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न ती करत आहे.

ankita walawalkar
ankita walawalkar

यातून त्यांना नक्कीच काहीतरी काम मिळेल असा विश्वास अंकिताने व्यक्त केला आहे. दरम्यान २०२० साली मनोहर माहिमकर यांच्याकडे कुठलेही काम नव्हते. त्यावेळी त्यांची परिस्थिती पाहून अभ्युदय बँकेचे चेअरमन संदीप घनदाट यांनी त्यांना आर्थिक मदत आणि काही जीवनावश्यक वस्तू घेऊन दिल्या होत्या. मनोहर माहिमकर हे भाड्याच्या घरात राहतात. बिल्डरकडुन घराच्या भाड्याचा चेक थकल्यामुळे त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते. हा वाद मिटावा यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन दिले होते. मात्र त्यानंतरही मनोहर माहिमकर यांची आर्थिक चणचणीमुळे कामासाठी धडपड सुरूच आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.