Breaking News
Home / जरा हटके / प्रसिद्ध अभिनेत्याचा थाटात पार पडला लग्नसोहळा.. मालिकेच्या कलाकारांनी लावली हजेरी
akash patil weds shamika salvi
akash patil weds shamika salvi

प्रसिद्ध अभिनेत्याचा थाटात पार पडला लग्नसोहळा.. मालिकेच्या कलाकारांनी लावली हजेरी

मराठी मालिका सृष्टीत रील लाईफ मध्ये जशी लगीनघाई सुरू आहे, तशीच लगीनघाई रिअल लाईफमध्येही पहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसात मालिका सृष्टीतील कलाकारांचा साखरपुडा पार पडला. यात तू चाल पुढं मालिकेतील अभिनेता ध्रुव दातार ह्याने अक्षता तिखे सोबत साखरपुडा केला. तर स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून प्रसिद्धीस आलेला आकाश पाटील याने शमिका साळवी सोबत साखरपुडा करून घेतला. यावेळी मालिकेची नायिका समृद्धी केळकर हिने हजेरी लावलेली होती. पण साखरपुडा झाल्यानंतर आकाश आणि शमिका यांचा विवाहसोहळा देखील पार पडलेला आहे.

akash patil weds shamika salvi
akash patil weds shamika salvi

काल सोमवारी १५ मे रोजी या दोघांनी लग्नाची गाठ बांधलेली आहे. या सोहळ्याला फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील हर्षद अतकारी, प्रशांत चौडप्पा. मालिकेचे दिग्दर्शक गिरीश वसईकर, ऐश्वर्या शेट्ये, तुषार साळी, भूमिजा पाटील यांनी हजेरी लावून नववधू वरास शुभाशीर्वाद दिले. आकाशच्या लग्नाची धामधूम कशी होती याचे क्षण त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आकाश पाटील हा मालिका चित्रपट अभिनेता आहे. टकाटक या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पाऊल टाकले होते. त्यानंतर तो मालिका सृष्टीत छोट्या मोठ्या भूमिका साकारताना दिसला. स्टार प्रवाह वरील अत्यंत लोकप्रिय असलेली मालिका फुलाला सुगंध मातीचा मालिकेने तब्ब्ल ७०० हुन अधिक एपिसोड सादर केले होते.

shamika salvi akash patil wedding
shamika salvi akash patil wedding

आगळ्या वेगळ्या कथानकामुळे मालिका कायम चर्चेत राहिली. फुलाला सुगंध मातीचा मालिकेमुळे अभिनेता आकाश पाटील याला अमाप प्रसिद्धी मिळाली, यात तो नायकाच्या भावाची भूमिका साकारत होता. जवळपास तीन वर्षे मालिकेने छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवले होते. बहुतेकदा टीआरपीच्या स्पर्धेत मालिकेने अव्वल स्थान पटकावलेले पाहायला मिळाले होते. त्यामुळे मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या आजही स्मरणात राहिली आहे. या मालिकेनंतर आकाश सन मराठीवरील कन्यादान मालिकेत सुद्धा झळकला होता. आकाश पाटील आणि शमिका साळवी या नवविवाहित दाम्पत्यावर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. नवविवाहितांच्या या आयुष्याच्या नवीन प्रवासासाठी अनेकानेक शुभेच्छा.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.