नुकतेच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेतील अभिनेत्री अमृता पवार हिचा निल पाटील सोबत मोठ्या थाटात विवाहसोहळा पार पडला. ६ जुलै २०२२ रोजी पार पडलेल्या अमृताच्या लग्नाला निवेदिता सराफ, शिल्पा नवलकर, सुपर्णा श्याम या अभिनेत्रींनी आवर्जून हजेरी लावली होती. अमृता पाठोपाठ मराठी मालिका सृष्टीतील आणखी एक नायिका विवाहबद्ध झाली आहे. गोठ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली रुपल नंद हिने अनिश कानविंदे सोबत थाटात लग्न केले आहे. रुपल नंद ज्याच्याशी विवाहबद्ध झाली तो अनिश कानविंदे मर्चंड नेव्ही मध्ये मरीन इंजिनिअर पदावर कार्यरत आहे.

रुपल नंदच्या लग्नाला यशोमन आपटे, सुरभी भावे, गुरू दिवेकर, मधुरा जोशी दिवेकर, सुप्रिया विनोद, केतकी विलास अशा खास कलाकारांनी हजेरी लावली होती. रुपल नंद ही उच्छशिक्षित असूनही अभिनय क्षेत्राकडे वळलेली पाहायला मिळाली. रुपल फिजिओथेरपीस्ट आहे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून तिने शिक्षण घेतले आहे. पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये तिने इंटर्नशिप केली होती. मात्र अभिनयाची आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती. कॉलेजमध्ये असतानाच तिने एकांकिकेतून सहभाग दर्शवला होता. एका ब्युटी काँटेस्टमध्ये रुपलने सहभाग घेतला त्यात तिची निवड झाली होती. त्या ब्युटी काँटेस्टमध्ये रुपलला बेस्ट पर्सनॅलिटीचं पारितोषिक मिळालं होतं. सतीश राजवाडे या स्पर्धेत परीक्षक म्हणून आले होते त्यांनी रुपलला तिथे पाहिले.

इथूनच तिला सतीश राजवाडे यांच्या मुंबई पुणे मुंबई २ मध्ये अभिनयाची संधी मिळाली होती. अँड जरा हटके या आणखी एका चित्रपटात ती झळकली. श्रीमंताघरची सून या मालिकेतून रुपलने मुख्य भूमिका साकारली होती. अभिनया सोबतच रुपलला पुढे जाऊन क्लिनिकही सुरू करण्याची ईच्छा आहे. नाटक चित्रपट अशा क्षेत्रातही तिला अनुभव घ्यायचा आहे. गोठ मालिकेमुळे रुपल प्रसिद्धीच्या झोतात आली होती. आनंदी हे जग सारे या मालिकेतील तिने साकारलेली आनंदी ही मानसिकदृष्ट्या विकलांग असलेली मुलगी होती. ही भूमिका रुपलने तिच्या अभिनयाने उत्तम निभावलेली पाहायला मिळाली होती. रुपल नंद आणि अनिश कानविंदे या नवविवाहित दाम्पत्यास आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.