स्टार प्रवाह वाहिनीवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील मानसी कानिटकरची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता फडके काल रविवारी १९ डिसेंबर २०२१ रोजी अभिनेता सारंग दोशी ह्याच्यासोबत विवाहबद्ध झाली आहे. अमृता फडके ही मूळची पुण्याची, पुणे युनिव्हर्सिटीमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अमृताने अनेक नाटकांतून काम केले आहे. यातूनच तिला मालिकेत झळकण्याची संधी मिळाली. श्री गुरुदेव दत्त, गर्ल्स हॉस्टेल या मालिकेत झळकली होती.
यानंतर अमृताने झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये पार्टीसिपेट केले होते. स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत तिला महत्वाची भूमिका मिळाली. अमृता फडके आणि सारंग दोषी हे दोघे एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत आहेत. या दोघांनी एकाच मालिकेत काम देखील केले होते. दूरदर्शन वाहिनीवरील संघर्ष मिलनाचा या मालिकेत हे दोघेही मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. इथूनच त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. सारंग दोषी हा मूळचा फलटणचा आहे. पुणे युनिव्हर्सिटीमधून त्याने पदवीचे शिक्षण घेतले आहे. छत्रपती संभाजी महाराज या नाटकात सारंग महत्वाच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय क्राईम स्टॉप सारख्या मालिकेतून तो खाकी वर्दीतल्या डॅशिंग भूमिकेत दिसला.
ती परत आलीये या झी मराठीवरील मालिकेत त्याने रोहिणीच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. सारंग आणि अमृता दोघेही मराठी मालिका सृष्टीत आपला जम बसवू पाहत आहेत. छोट्या मोठ्या भूमिका साकारत ते हळूहळू या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत भली मोठी स्टार कास्ट आणि तितकेच दमदार कलाकार असूनही अमृताने साकारलेली मानसीची भूमिका तिच्या अभिनयाने उठावदार झाली आहे. या मालिकेमुळे अमृताला प्रसिद्धी मिळत आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोने अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली आहे यातूनच अमृता देखील प्रसिद्धीच्या झोतात आली होती. अमृता आणि सारंग या दोघांनाही वैवाहिक आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा.