Breaking News
Home / जरा हटके / मराठी अभिनेत्याचा पार पडला हळदीचा सोहळा.. रजिस्टर पद्धतीने केले लग्न
abhay mahajan wedding
abhay mahajan wedding

मराठी अभिनेत्याचा पार पडला हळदीचा सोहळा.. रजिस्टर पद्धतीने केले लग्न

मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून लग्नाची धामधूम सुरू झालेली पाहायला मिळत आहे. नुकतेच बहुचर्चित जोडी म्हणजेच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचे मोठ्या थाटात लग्नाचा सोहळा पार पडला. या बातमीसोबतच आता मराठी सृष्टीतील आणखी एक अभिनेता लग्नाच्या गाठित अडकला आहे. लकी चित्रपट फेम अभिनेता अभय महाजन याने नुकतेच कोरिओग्राफर असलेल्या दिया नायडू सोबत लग्न केले आहे. काही दिवसांपूर्वीच अभयचे केळवण साजरे करण्यात आले होते. पर्ण पेठे, अलोक राजवाडे, अक्षय टंकसाळे या त्याच्या खास मित्रांनी अभयचे केळवण केले होते. त्यानंतर अभय लवकरच लग्न करणार हे स्पष्ट झाले होते.

abhay mahajan wedding
abhay mahajan wedding

अभय आणि दियाचा मेहेंदी सोहळा थाटात पार पडला आहे. यावेळी अभयने आपल्या हातावर मेहेंदीने दिवा काढून दियाच्या नावाने हटके अंदाजात मेहेंदि सजवली होती. त्यानंतर त्यांची हळद आणि संगीत सोहळा रंगलेला पाहायला मिळाला. यावेळी मोजक्याच मित्रमंडळींना त्यांनी आपल्या लग्नाला आमंत्रण दिले होते. कुबुल है असे हटके अंदाजात म्हणत आणि केक कापून अभयने लग्नाच्या आणाभाका घेतलेल्या पाहायला मिळाल्या. तर दिया आणि अभयने रजिस्टर पद्धतीनेही लग्न केलेले पाहायला मिळाले. प्रिया बापट, पर्ण पेठे, अलोक राजवाडे यासारख्या सेलिब्रिटींनी तसेच चाहत्यांनी दिया आणि अभयला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभय महाजनला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती.

diya naidu abhay mahajan
diya naidu abhay mahajan

बीएमसीसी कॉलेजमधून त्याने पदवीचे शिक्षण घेतले. पुण्यातील नाटक कंपनी संस्थेशी तो जोडला गेला. अभिनया सोबतच अभयने भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे. भाडिपाच्या अनेक सिरीजमधून तो प्रेक्षकांसमोर आला आहे. संजय जाधव यांच्या लकी चित्रपटातून तो मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकला होता. कहाणी मित्र की, खामोश अदालत जारी है या नाटकातून तो महत्वाची भूमिका साकारताना दिसला. शांतीत क्रांती वेबसिरीज, अवांछित, अश्लील उद्योग मित्र मंडळ अशा चित्रपटातून तो मोठ्या पडद्यावर झळकला. माझ्याकडं बघतया खुदकन हसतया हे गाजलेलं गाणं अभयवर चित्रित झालं होतं. या गाण्यामुळे अभय महाजन लोकप्रियता मिळवताना दिसला. अभय आणि दिया या नवदाम्पत्यास वैवाहिक जीवनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.