२०१६ साली कलर्स मराठी वाहिनीवर किती सांगायचंय मला ही मालिका प्रसारित केली जात होती. नुपूर परुळेकर आणि आशय कुलकर्णी हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. तर शर्मिष्ठा राऊत, सविता मालपेकर विवेक लागू ,सीमा देशमुख यांच्याही मालिकेत महत्वाच्या भूमिका होत्या. या मालिकेतली प्राप्ती रेडकर ही बालकलाकार आज मराठी मालिका सृष्टीत पुन्हा एकदा परतलेली पहायला मिळत आहे. २०१६ नंतर जवळपास सात वर्षाने ही बालकलाकार आता कशी दिसते, याचीही उत्सुकता तुमच्यामध्ये निर्माण झाली असेल. ही बालकलाकार आता लवकरच सुरू होत असलेल्या कलर्स मराठीवरील काव्यांजली सखी सावली मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
२९ मे पासून रात्री ८.३० वाजता ही मालिका कलर्स मराठीवर प्रसारित होत आहे. कन्नड मालिका भाग्यलक्ष्मी या मालिकेचा ती रिमेक असणार आहे. अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तिच्या धाकट्या बहिणीची भूमिका प्राप्ती रेडकर निभावताना दिसणार आहे. प्राप्ती बद्दल सांगायचं झालं तर तिने किती सांगायचंय मला मालिकेनंतर अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतलेला पाहायला मिळाला. यानंतर तिने आपले संपूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित केले. एवढेच नाही तर खेळामध्येही तिने विशेष प्राविण्य मिळवलेले आहे. गेल्या वर्षी चेन्नई येथे पार पडलेल्या वाको इंडिया सिनियर नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेत प्राप्तीने सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेमध्ये तिने सुवर्ण पदक पटकावले होते. तेव्हा मुंबईच्या प्राप्तीचे मोठे कौतुक झाले होते.
वृत्त माध्यमांनीही तिच्या या कामगिरीची दखल घेतली होती. प्राप्ती एका म्युजिक व्हिडीओ मध्येही प्रमुख भूमिकेत झळकली होती. यानंतर ती मेरे साई या हिंदी मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. हिंदी मालिकेतून काम केल्यानंतर तिला पुन्हा एकदा मराठी मालिकेची ऑफर आली आहे. दोन बहिणीच्या नात्याची गोष्ट काव्यांजली सखी सावली या मालिकेतून उलगडणार आहे. यात प्राप्तीसह कश्मिरा कुलकर्णी, पियुष रानडे, पूजा पवार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. बऱ्याच प्रतीक्षेनंतर कश्मिरा कुलकर्णी हिला देखील या मालिकेतून अभिनयाची संधी मिळत आहे. यात ती नायिकेची भूमिका साकारत असून पियुष रानडे सोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या नवीन मालिकेमुळे जीव माझा गुंतला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे निश्चित झाले आहे.