गेल्या वर्षात मानसी नाईकच्या घटस्फोटाच्या चर्चेमुळे चंदेरी दुनियेत एकच खळबळ उडाली होती. अवघ्या दीड वर्षाच्या संसारानंतर मानसी नाईक प्रदीप खरेरा पासून वेगळी होतीये ही बातमी तिने मीडिया माध्यमांशी बोलताना सांगितली होती. यानंतर ती प्रदीप पासून का वेगळी होतीये याचेही कारण तिने सांगितले होते. प्रदीपने आपल्याशी केवळ पैसे मिळवण्यासाठीच लग्न केले असल्याचे तिने म्हटले होते. जेव्हा पैसे मिळणे बंद झाले तेव्हा तो व्यक्ती आपले खरे रंग दाखवू लागला. म्हणूनच या नात्यात जर प्रेमच नसेल तर ते जोडून ठेवण्यात काहीच अर्थ नाही असे म्हणत तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असल्याचे जाहीर केले.
त्यानंतर मानसी आणि प्रदीपची मीडियाच्या माध्यमातून खडाजंगी सुरू झाली. अगदी शीतयुद्ध म्हणावं तसं हे दोघेही एकमेकांना शेरो शायरीच्या अंदाजात विरोधी प्रतिक्रिया देऊ लागले. पण कालांतराने दोघेही शांत झाले आणि आपापल्या कामालास लागलेले पाहायला मिळाले. दरम्यान मानसी नाईक मराठी चित्रपटातून आयटम सॉंग करताना दिसली तर काही म्युजिक व्हिडीओ अल्बममध्ये ती झळकलेली पाहायला मिळाली. तर तिकडे प्रदीपनेही आपले लक्ष्य मॉडेलिंग क्षेत्राकडे वळवले. मानसी नाईक आता या दुःखातून पूर्णपणे सावरली आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाखातर ती मागच्या गोष्टी मूव्ह ऑन करायला शिकली आहे. एक नवीन इनिंग आणि नवीन सुरुवात असे म्हणत ती आता नवनवीन प्रोजेक्ट स्वीकारू लागली आहे. आपल्या करिअरवर लक्ष्य देणाऱ्या मानसीने नुकतंच स्वतःचं घर घेतलं आहे.
काल अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मानसीने नव्या घरात गृहप्रवेश करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे.प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं एक स्वतःचं घर असावं.जेथे आपल्या लोकांनी हसावं. दमलेल्या जीवसाठी ते विसाव्याच स्थान असावं. या रखरखीत जगण्यात वावरताना उमेद देणारं डोळ्यासमोर तुम्हाला तुमचं घर दिसावं. माझी उर्जास्थान बनले माझे नवीन घर मांगल्याचे दुसरे रूप असते एक घर, संस्काराची शिदोरी असते एक घर ,माझे घर. असे म्हणत तिने अक्षय तृतीयेच्या निमित्ताने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मानसीने दिलेल्या या आनंदाच्या बतमीनंतर तिच्यावर सेलिब्रिटी विश्वातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. तसेच तिला भरभरून शुभेच्छाही मिळत आहेत.