आपले आवडते कलाकार सध्या काय करतात, कोणाला डेट करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमुळे घराघरात पोहोचलेली शिवाली परब आता मालिका सृष्टी सोबतच मोठ्या पडद्यावर देखील आपले अस्तित्व निर्माण करताना दिसत आहे. चित्रपटातील तिच्या हटके भूमिकांनी प्रेक्षकांचे कायमच लक्ष्य वेधून घेतले आहे. त्यामुळे शिवालीच्या चाहत्यांच्या संख्येत आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शिवाली परब हिने एक फोटो शेअर करत डेट करत असल्याचे जाहीर केले होते. निमिष कुलकर्णी ह्याचा हात हातात घेतलेला एक फोटो शिवालीने सोशल मीडियावर शेअर केला होता.

डेट विथ निब्बा असे तिने यावर कॅप्शन दिल्याने सगळ्यांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. शिवाली आणि निमिष अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले आहेत. त्यामुळे तिच्या या कॅप्शनमुळे दोघेही एकमेकांच्या प्रेमात तर नाही ना अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान याअगोदर देखील हास्यजत्रा मधील कलाकारांनी एकमेकांसोबतचे फोटो शेअर केल्यामुळे डेट करत असल्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या. ओंकार राऊत आणि प्रियदर्शनी यांच्या फोटोमुळे ही चर्चा सेलिब्रिटी विश्वाने देखील अधोरेखित केली होती. आस्ताद काळे याच्या हटके कमेंटमुळे ही चर्चा अधिकच वाढली. मात्र आम्ही केवळ मित्र आहोत असे या कलाकारांनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र शिवाली परब आणि निमिष कुलकर्णी यांच्या या फोटोवरून हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचे स्पष्ट होते.

निमिष कुलकर्णीचा देखील चांगला फॅनफॉलोअर्स झाला आहे. निमिषने अभिनयाचा हा प्रवास रंगभूमीपासून सुरु केला होता. यासाठी रुपारेल कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेऊन नाटकात काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून त्याला छोट्या छोट्या भूमिका मिळत असत. मात्र आपल्याही वाट्याला अशी भूमिका यावी ज्यामुळे प्रेक्षक आपल्याला ओळखतील ही त्याची इच्छा सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून पूर्ण झाली. निमिष या मालिकेत वैभवचे पात्र साकारत आहे. निमिषने शिवाली परबचा हातात हात घेतलेला एक फोटो फेमस झाला. आणि हे दिघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत असे बोलले जाऊ लागले. निब्बा या कॅप्शन वरून निमिष आणि शिवाली खरंच एकमेकांना डेट करत आहेत की केवळ चर्चेत राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.