Breaking News
Home / जरा हटके / संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम यांची लव्हस्टोरी.. दुसऱ्याच भेटीत ६४ रूपयांमुळे गेलेली इज्जत
sanket pathak suparna shyam love story
sanket pathak suparna shyam love story

संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम यांची लव्हस्टोरी.. दुसऱ्याच भेटीत ६४ रूपयांमुळे गेलेली इज्जत

डिसेंबर २०२२ मध्ये मराठी मालिका सृष्टीतील कलाकारांनी साखरपुडा करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नाची बेडी मालिका फेम संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम यांनी गुपचूप साखरपुडा केला होता. हे कधी आणि कसं घडलं याबाबत सेलिब्रिटींना आणि त्यांच्या चाहत्यांना देखील माहीत नव्हतं. म्हणूनच व्हॅलेंटाईनच्या दिवसाचे औचित्य साधून त्यांनी एक मुलाखत देण्याचे ठरवले आणि या गोष्टींचा उलगडा केलेला पाहायला मिळाला. संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम या दोघांनी दुहेरी मालिकेत एकत्रित काम केले होते. मालिकेच्या सेटवरच दोघांची पहिली भेट झाली होती. खरं तर सुपर्णा आपल्या मेकअप रूममध्ये फोटोशूट साठी तयार होत होती.

sanket pathak suparna shyam love story
sanket pathak suparna shyam love story

आपल्याला कोणासोबत फोटोशूट करायचंय हे जाणून घेण्यासाठी आणि ओळख बनवण्यासाठी संकेत तिथे एका असिस्टंट बरोबर आला. मात्र सुपर्णा त्यावेळी व्यस्त असल्याने तिने दार बंद केले, पण त्याच वेळी एका नजरेत तिने संकेतकडे पाहिलं. तेव्हा ती पहिली नजर काहीतरी कमाल घडवून आणणार असे संकेत देऊन गेली. तासाभराने फोटोशूट होते, यावेळी आयोजकांना हवा तसा फोटो काही वेळातच क्लिक सुद्धा झाला. या दोघांची पहिली भेट घडून आली तो दिवस होता २९ सप्टेंबर २०१६. मालिकेच्या सेटवर काम करताना दोघांची मैत्री सुद्धा झाली. २ ऑक्टोबर रोजी काहीतरी खावं म्हणून हे दोघे जवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेले. ड्राय डे असल्याने सुपर्णाने फक्त लिंबू सरबत मागवले. सरबताचे ६४ रुपये बिल देण्यासाठी संकेतने कार्ड स्वाईप करण्यास सांगितले.

suparna shyam sanket pathak
suparna shyam sanket pathak

मात्र वेटरने सुट्टे पैसे द्या अशी विनंती केली, तेव्हा संकेत नुसता बघतच राहिला. कारण संकेतच्या खिशात त्यावेळी एकही रुपया नव्हता. तेव्हा ही परिस्थिती पाहून सुपर्णाने पर्समधून शंभरची नोट काढली आणि किप द चेंज म्हणत वेटरला दिली. आपल्याकडे साधे ६४ रुपये नाहीत आणि एवढ्या पैशांसाठी या दोन मुलींसमोर आपली इज्जत गेली असा फिल त्याला कावराबावरा करून गेला. यानंतर संकेत आणि सुपर्णा दोघेही एकमेकांना आवडु लागले, मात्र प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नव्हतं. हे पाहून सुपर्णाने एक दिवस दोघांच्याही घरच्यांची परवानगी घेतली आणि संकेतच्या आत्याच्या मुलीच्या लग्नात जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली. दोघांच्याही घरचे खूप सपोर्टीव्ह असल्याने त्यांनी सुपर्णाची मोठी मदत केली होती. नातेवाईकांच्या मदतीने तिने हा सरप्राईज प्लॅन आखला होता.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.