Breaking News
Home / जरा हटके / एक दुःख असं आहे की, मी तुझ्यापासून वेगळं होतोय आणि दुसरं दुःख.. मानसी नाईकच्या नवऱ्याची प्रतिक्रिया
manasi naik pradeep kharera christmas
manasi naik pradeep kharera christmas

एक दुःख असं आहे की, मी तुझ्यापासून वेगळं होतोय आणि दुसरं दुःख.. मानसी नाईकच्या नवऱ्याची प्रतिक्रिया

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चा सुरू असतानाच आता या दोघांनी सोशल माध्यमातून एकमेकांच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झालेले आहे. मीडियाशी बोलताना मानसीने तिच्या घटस्फोट घेण्यामागचे कारण सांगितले होते. प्रदीप आणि मानसीची ओळख तीन वर्षांपूर्वी झाली होती. मागील काही वर्ष हे दोघे लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होते. त्यानंतर लगेचच या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नानंतर प्रदीप कसा आहे हे तिला हळूहळू उलगडायला लागले.

manasi naik pradeep kharera christmas
manasi naik pradeep kharera christmas

प्रदीपने फक्त पैशांसाठी आपल्यासोबत लग्न केलं आहे असे ती मीडियाशी बोलताना म्हणाली होती. यानंतर प्रदीपने कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी तो मीडियावरील रिल्स आणि पोस्टच्या माध्यमातून मानसीला धारेवर धरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदीपने सोशल स्टार्स असलेल्या तरुणींसोबत रिल्स बनवले होते. तर कधी रीलमध्ये रडताना देखील दिसला होता. मात्र हे पाहून प्रदीप खोटं वागत असल्याचे मानसीने म्हटले आहे. प्रदीप एका बाजूला पार्ट्या करतोय, तरुणींसोबत रिल्स बनवतोय आणि दुसरीकडे मात्र रडण्याचे नाटक करतोय. मी दुःखी खोटे दाखवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तू असं करून लोकांची सहानुभूती मिळवू शकता नाही. तू किती ढोंगी आहेस हे तुझ्या वागण्यातुनच समजतंय असे आरोप लावत म्हणाली होती.

athlete pradeep kharera manasi naik
athlete pradeep kharera manasi naik

तिच्या आरोपांवर प्रदीपने पलटवार केला, माझं जीवन कसं जगायचं हे कोणीही सांगू नये. लोक माझ्याविषयी काय विचार करतात याची मी पर्वा करत नाही, असे प्रदीप एका रीलमध्ये म्हणताना दिसला. सोबतच तो मानसी पासून विभक्त होत असल्याने दुःखी आहे आणि यातूनच मला प्रसिद्धी मिळत आहे असेही म्हणतो आहे. शायरी अंदाजात प्रदीप म्हणतो, एक दुःख असं आहे की मी तुझ्यापासून वेगळं होतोय. दुसरं दुःख असं आहे की तू स्वतः माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेस. प्रदीपने बनवलेले हे रिल्स मात्र मानसीच्या विरोधात आहेत. मानसीला दुखावण्याच्या हेतूनेच तो असे प्रकार करत आहे. या रिल्समध्ये तो अश्लील कृत्य देखील करताना दिसत आहे. त्यामुळे प्रदीपच्या वागण्यावर मानसीच्या चाहत्यांनी विरोध दर्शवला आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.