गेल्या काही दिवसांपासून भिडे गुरुजींच्या वक्तव्यामुळे महिलांनी कपाळावर कुंकू किंवा टिकली लावावी की नाही? हा वाद चांगलाच पेटलेला पाहायला मिळाला. अर्थात ता वादात अभिनेत्री राधिका देशपांडे हिने देखील टिकली का लावावी याबाबत मत व्यक्त केले. टिकलीच्या वादानंतर आता राधिकाने फटाके वाजवण्यावरून एक पोस्ट लिहिली आहे. फटाक्याच्या विरोधात बोलणारी मंडळी आता नवीन वर्षाच्या स्वागताचा तयारीला लागणार आहेत. त्यात ती म्हणते की, फटाके, दिवाळीत आपण सगळेच फटाके उडवतो. हो आपण सगळेच; नाही म्हणजे अगदी सगळेच नाही.

म्हणजे बघा ना, टिकली पासून तर फुलझड्या, साप, अनार, चक्र, सुतळी बॉम्ब, लड, लवंगी फटका इत्यादी पैकी एक दोन तरी उडवतोच उडवतो. अहो, पिढ्यानपिढ्या उडवत आलो आहोत आपण फटाके. हं, आता ह्या वर्षी उडवणार का फटाके? म्हंटल्यावर उडवा उडवीची उत्तरं मिळाली आहेत म्हणा. का? दूषित वातावरणामध्ये प्रदुशितांना फटाक्यांमधले दोष आढळून आले. त्यामुळे कोणी कितीही उपोषणाला बसलं तरी चालेल पण तुम्ही फटाक्यांच्या बाबतीत कुपोषित असायला हवे. का? कारणं ठरलेली आहेत. दिवाळीतल्या दिवसांमध्ये फटाक्यांनीच प्रदूषण वाढतं, मोठा आवाज होतो. फटाक्यांमधल्या दारूगोळामुळे वायुप्रदूषण होऊन खोकला, दम्याचा त्रास होतो. शास्त्रात कुठे लिहिलं नाही फटाके उडवा. फटाक्यांचा कचरा होतो. त्यामुळे फटाके बंद, चीडीचूप.

काय होते ते दिवस जेंव्हा हातात फुलझडी घेऊन आम्ही भाऊबीज साजरी करायचो. वडिलांबरोबर अनार लावत पाडवा साजरा करायचो. तो दारुगोळ्याचा वास आणि धूर काळ्याकुट्ट रात्री सर्वत्र पसरायचा आणि आपण एकदम योद्धा होऊन शौर्य गाजवल्या सारखं वाटायचं. पण आता? नाही हो, आता नं अपराध्या सारखा फील येतो. दारूगोळ्याच्या वासानं अवकाशात विष पेरल्या सारखं वाटतं. दूषित होतं वातावरण दिवाळीमुळे. हिंदूराष्ट्र हे शांतता प्रिय आहे. ते ऊट सूट परराष्ट्रावर फणा काढत नाही. गरज असली तर शिकार आणि वेळ आलीच तर गर्जना करणारं सिंह राष्ट्र आहे. ह्या सिंहाचं तोंड दाबून धरणं काय सोपं वाटलं? सिंह गर्जना करणार. आता हिंदू शांत बसत नाही. जिथे दाबायचा प्रयत्न कराल तिथे तो डरकाळी फोडणार, आवाज होणार.