मराठी सृष्टीत खूप कमी नायिका आहेत ज्या केवळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अभिनयाचे कुठलेही आढेवेढे न घेता, कुठल्याही प्रकारे कपड्यांची फॅशन करून अंगप्रदर्शन न करता एक अभिनेत्री आजही रसिकांच्या मनात जागा टिकवून ठेवून आहे. ती अभिनेत्री म्हणजे ‘मृणाल दुसानिस’. हे मन बावरे या मालिकेने एक्झिट घेतल्यानंतर मृणाल तिच्या नवऱ्यासोबत अमेरिकेला राहायला गेली. अभिनयातून ब्रेक घेऊन तिला आता काही वर्षे लोटली आहेत. या प्रवासात तिने मातृत्वाचे सुख अनुभवले आहे. २४ मार्च २०२२ रोजी मृणाल आणि नीरज मोरे यांना कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यावेळी तिने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
‘नुरवी’ हे तिच्या ७ महिन्यांच्या लेकीचं नाव आहे. नुरवी म्हणजे फुलांचा सुगंध, दुःखाचा नाश करणे असा होतो. आपल्या आयुष्यात नवीन चैतन्य निर्माण करणाऱ्या लेकीचं नाव नूरवी असावं हे मृणाल आणि निरजने अगोदरच ठरवून ठेवलं होतं. नुकतीच या तिघांनी अमेरिकेत दिवाळी साजरी केली आहे. नूरवीच्या जन्मानंतर मृणालने आपल्या लूकमध्ये देखील बदल केलेला पाहायला मिळतो आहे. डोक्यावर लांबसडक केस असलेल्या मृणालने तिचे केस कापले आहेत. त्यामुळे तिच्या लूकमध्ये आता कमालीचा बदल झालेला आहे. तिचा हा नवीन लूक पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर बहुतेकांनी तिचा हा लूक आवडल्याचे म्हटले आहे.
अर्थात आईपण अनुभवणाऱ्या प्रत्येकीसाठी आपला वेळ केस विंचरण्यात जाऊ नये, त्याचप्रमाणे पटकन तयार होता यावे म्हणून केस बटीक केले जातात. मृणालने देखील आपल्या लाडक्या लेकिसाठी हा पर्याय निवडला असावा असे बोलले जात आहे. त्यामुळे मृणालच्या नव्या लुकला महिलावर्गाकडून जास्त पसंती मिळाली आहे. माझिया प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी, अस्स सासर सुरेख बाई, हे मन बावरे या मालिकांमधून मृणालने मुख्य भूमिका बजावल्या आहेत. अभिनयाचे कुठलेही आढेवेढे न घेता केवळ चेहऱ्यावरील हावभाव वरून अभिनय साकारून या अभिनेत्रीने अनेकांना भुरळ घातली. मृणाल दुसानिस ही मूळची नाशिकची. नाशिक येथेच तिचे पदवीचे शिक्षण झाले आणि पत्रकारितेची पदवी देखील तिने प्राप्त केली.
अभिनयाची विशेष आवड असल्याने तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यात तिला यश देखील मिळालं. मालिकांमधून मुख्य भूमिका निभावत असतानाच २५ फेब्रुवारी २०१६ रोजी नीरज मोरे यांच्याशी मृणालचा विवाह झाला. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला निरज यूएसमध्ये टेक्सास सिटी येथे कार्यरत आहे. अस्स सासर सुरेख बाई या मालिकेतून एक्झिट घेऊन ती काही काळासाठी अमेरिकेत गेली होती. त्यानंतर हे मन बावरे या मालिकेतील लीड रोलमुळे ती पुन्हा मायदेशी परतली. हे मन बावरे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला; तेव्हा ती पुन्हा अमेरिकेत स्थायिक झालेली पाहायला मिळाली. आता नूरवीच्या बाललीला पाहण्यात आणि तिचे संगोपन करण्यातच ती रमलेली आहे. त्यामुळे अजून काही वर्षे तरी ती अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार नाही हे स्पष्ट आहे.