सुख म्हणजे नक्की काय असतं या प्रसिद्ध मालिकेत गौरी शिर्के पाटीलची भूमिका पार पाडणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत तिला मिळणारी वागणूक आणि यावर तिच्या सध्या सरळ व्यक्त केलेल्या भावना प्रेक्षकांना खूपच आवडत आहेत. एक उत्तम अभिनेत्री म्हणून आपली छाप सोडणारी गिरिजा प्रभू खऱ्या आयुष्यात एक उत्तम डान्सर आणि मॉडेल देखील आहे. या मालिकेत साधी सरळ भूमिका देण्यात आली आहे. परंतु खऱ्या आयुष्यात ती एक चांगली मॉडेल आहे. नुकताच तिचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. गिरजाने या अगोदर लक्ष्य, विठू माऊली, जय मल्हार, क्राईम डायरी अशा मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.
अनेक लहान भूमिका केल्या नंतर सुख म्हणजे नक्की काय असतं यामध्ये तिला पहिल्यांदाच प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील भूमिकेमुळे ती घरा घरात पोहोचली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने गिरिजाला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. गिरिजा बद्दल बोलायचं झालं तर गिरिजा प्रभूचा जन्म २७ नोव्हेंबर २००० रोजी गोवा येथे झाला. तिने पीडीईएच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ आर्टसचे शिक्षण घेतले आहे. यापूर्वी तिने युवा डान्सिंग क्वीन हा रिऍलिटी शो देखील केला आहे. तसेच तिने कौल मनाचा, काय झालं कळणा या चित्रपटात देखील काम केले आहे. गिरीजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
गिरिजाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ३ लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. त्यांचे मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत जोडून राहण्यासाठी ती नेहमीच सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या दैनंदिन जीवनातील फोटो शेअर करत असते. ज्यावर ती हटके कॅप्शन देखील देत असते. नुकताच तिने फोटोशूट केले, ज्याचे फोटो तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने पारंपरिक वेशभूषेत म्हणजेच साडी परिधान केल्याचा फोटो शेअर केला आहे. तिचे गोड हास्य आणि ही पोज चाहत्यांच्या काळजावर वार करणारी आहे. या फोटोवर कॅप्शन म्हणून तिने जांभळ्या आणि लाल रंगाचा हार्ट शेअर केला आहे. या फोटोंवर चाहते सुंदर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.