राजा राणी ची गं जोडी या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. दादासाहेब ढाणे पाटील हे विरोधी पात्र अभिनेते शैलेश कोरडे यांनी आपल्या अभिनयाने गाजवले आहे. संजीवनी आणि रणजित यांच्या आयुष्यात अनेक संकट येण्याचे कारण दादासाहेब ढाणे पाटील हेच होते. त्यांच्या कटकरस्थानाचा काही दिवसांपूर्विच उलगडा झाला होता. रणजित ढाणे पाटीलच्या भूमिकेने शैलेश कोरडे यांना अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. दादासाहेब हे विरोधी पात्र असल्याने प्रेक्षकांना त्यांचा राग यायचा हीच त्यांच्या सजग अभिनयाची पावती ठरली आहे.
शैलेश कोरडे यांनी दोन दिवसांपूर्वी अगदी सध्या पद्धतीने आणि मोजक्याच मित्रमंडळींच्या समवेत अभिनेत्री श्रुती कुलकर्णी हिच्यासोबत लग्न गाठ बांधली आहे. ‘अचानक निर्णय झाल्यामुळे आणि सद्य परिस्थितीमुळे कमी मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. तरी आपणा सर्वांचे आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी आहेत, अशी अपेक्षा करतो.’ असे म्हणत शैलेश कोरडे यांनी लग्नसोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शैलेश कोरडे यांनी झी मराठीवरील लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू या मालिकेत देखील काम केले होते. मदनचा भाऊ पोपटरावांची भूमिका शैलेशने या मालिकेतून निभावली होती. शैलेशची पत्नी श्रुती कुलकर्णी या देखील अभिनेत्री आहेत. अमोल कोल्हे यांच्यासोबत त्यांनी नाटकातून काम केले आहे.
फक्त मराठीवरील स्पेशल पोलीस फोर्स या मालिकेतून श्रुती कुलकर्णी यांना अभिनयाची संधी मिळाली होती. नाटक मालिका यातून त्यांना छोट्या मोठ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. अभिनया सोबतच श्रुती कुलकर्णी यांना नृत्य आणि गायनाची आवड आहे. मिसिंग द अनटोल्ड या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रुतीने केले होते. चिन्मय मांडलेकर लिखित आणि मनोज ठाकूर दिग्दर्शित समुद्र या नाटकातून श्रुतीने महत्वाची भूमिका बजावली होती. राजा राणीची गं जोडी ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. त्यामुळे दादासाहेबांचे विरोधी भूमिका दर्शवणारे पात्र प्रेक्षकांच्या चांगलेत स्मरणात राहीले आहे. शैलेश कोरडे आणि श्रुती कुलकर्णी या नवविवाहित दाम्पत्यास मनःपूर्वक शुभेच्छा.