Breaking News
Home / मराठी तडका / सांग तू आहेस का मालिकेतील अभिनेत्री विवाहबद्ध.. मालिकेच्या कलाकारांनी लावली हजेरी
dipti bhagyashri wedding
dipti bhagyashri wedding

सांग तू आहेस का मालिकेतील अभिनेत्री विवाहबद्ध.. मालिकेच्या कलाकारांनी लावली हजेरी

मराठी मालिका अभिनेत्री भाग्यश्री दळवी ही नुकतीच विवाहबद्ध झाली आहे. भाग्यश्री दळवी हिने सांग तू आहेस का या मालिकेत सिद्धार्थ चांदेकरच्या बहिणीची म्हणजेच दिप्तीची भूमिका साकारली होती. या मालिकेतून भावा बहिणीची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. भाग्यश्री दळवी हिच्या घरी दोन दिवसांपासून लगीनघाई सुरू होती. त्याअगोदर नवी सुरुवात, Bride to be असे म्हणत तीने लवकरच लग्न करणार आहोत असे जाहीर केले होते.

actress bhagyashri dalvi pratik
actress bhagyashri dalvi pratik

प्रतीक आणि भाग्यश्री दळवी नुकतेच विवाहबंधनात अडकले असून त्यांच्या लग्नाला शिवानी रांगोळे, सानीया चौधरी, विराजस कुलकर्णी, गुरू दिवेकर, सुलेखा तळवलकर, दिशा दानडे या कलाकारांनी हजेरी लावली होती. भाग्यश्री दळवी हिने सांग तू आहेस का या मालिके व्यतिरिक्त सारे तुझ्याचसाठी या मालिकेत देखील महत्वाची भूमिका निभावली होती. कॉलेजमध्ये असताना भाग्यश्रीने नाट्य स्पर्शा आणि एकांकिकांमध्ये सहभाग दर्शवला होता. प्रत्येक बॉयफ्रेंडची  गमतीशीर व्यथा मांडणारी ‘मी माझी गर्लफ्रेंड आणि..’ या युट्युबवरील वेबसिरीजमध्ये भाग्यश्री झळकली होती. महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील कलाकार रोहित माने आणि भाग्यश्री यांची जुळून आलेली केमिस्ट्री अफलातून होती. ही वेबसिरीज तरुणांमध्ये तुफान लोकप्रियता मिळवताना दिसली होती. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड यांच्या जीवनातील रोजच्या घडणाऱ्या गमतीजमती या मधून प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या होत्या.

bhagyashri dalvi wedding
bhagyashri dalvi wedding

या लोकप्रियतेतुन भाग्यश्रीला सांग तू आहेस का मालिकेत झळकण्याची संधी मिळाली तर रोहित माने हा देखील आता हास्य जत्रेत एक विनोदी कलाकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहे. सांग तू आहेस का या मालिकेत काम करत असतानाच भाग्यश्रीने प्रतीक सोबत मोठ्या थाटात साखरपुडा केला होता त्यावेळी सिद्धार्थ चांदेकरसह मालिकेच्या कलाकारांची हजेरी लावली होती. काल रविवारी १२ डिसेंबर रोजी त्यांचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. मालिकेच्या कलाकारांनी तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत. त्यावरून अनेक कलाकारांनी भाग्यश्री आणि प्रतिकला शुभेच्छा दिल्या आहेत.

dipti bhagyashri wedding
dipti bhagyashri wedding

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.