सोनी मराठी वाहिनीवर कुसूम मालिका प्रसारित होत आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वीच कुसूम आणि अनुजचे लग्न झाले आहे मात्र लग्नानंतर त्यांच्यातला दुरावा कमी होणार का? अनुजकुसुमला स्वीकारणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे. मालिकेत कुसुमची वहिनी म्हणजेच मृदुलाचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचा विवाह सोहळा पार पडला आहे. मृदुलाची भूमिका साकारली आहे अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी हिने, अभिषेक सोबत वेदांगी कुलकर्णी विवाहबद्ध झाली आहे.
वेदांगी कुलकर्णी ही मराठी मालिका अभिनेत्री आहे तसेच ती उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. अभिनय क्षेत्रात वेदांगीचे पाऊल ओघानेच पडले असे म्हणायला हरकत नाही कारण अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर तिने झी वाहिनीवरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या रियालिटी शोमध्ये पार्टीसिपेट केले होते. या शोमधून वेदांगीने आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. या रियालिटी शो नंतर तीला मालिकेत अभिनयाची संधी मिळाली. मालिकांमधून सहनायीका साकारत असतानाच “साथ दे तू मला ” या मालिकेतून मुख्य भूमिकेसाठी तिला विचारण्यात आलं. या भूमिकेमुळे वेदांगीला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. अभिनयासोबत वेदांगीने नृत्य सादर करून अनेक बक्षिसं मिळवली आहेत. वेदांगी कुलकर्णी ही मूळची मुंबईची डहाणूकर कॉलेज आणि डी जी रुपारेल कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले आहे. वेदांगी मुंबईत “व्हिक्टोरियस डान्स अकॅडमी” चालवत असून यामधून तिने अनेकांना नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे. स्टार प्रवाह वरील “साथ दे तू मला” या मालिकेतून प्राजक्ताची प्रमुख भूमिका तिने साकारली होती. याशिवाय झी युवा वरील ‘सूर राहू दे’ मालिकाही तीने अभिनित केली आहे. लंडनच्या आजीबाई, मऊ, छडा, लौट आओ गौरी, बिलिव्ह इन सारख्या नाटक तसेच वेबसिरीजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांसमोर आली.
वेदांगीच्या घरी गेल्या तीन दिवसांपासून लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळत होती. ह्याच वर्षी १९ एप्रिल रोजी वेदांगीने अभिषेक तिळगुळकर सोबत साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी वेदांगी आणि अभिषेक आज विवाहबद्ध झाले आहेत. तीन दिवसांपूर्वी मेहेंदीचा सोहळा, संगीत सोहळा तसेच काल हळदीच्या सोहळ्यात त्यांनी अनेक मित्र मंडळींना आमंत्रित केले होते. या सोहळ्याचे खास क्षण तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. काल २० नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांनी मोठ्या थाटात लग्न केलं आहे. रॉयल एन्ट्री करत वेदांगीचे मंडपात आगमन झाले होते त्यावेळी पिवळ्या रंगाच्या साडीतील तिचं रूप अधिकच खुलून आलेलं दिसलं. पेशवाई थाटात वेदांगी आणि अभिषेक यांचा आज दुपारी विवाह संपन्न झाला. अभिषेक तीळगूळकर याने ऑस्ट्रेलियातुन एमबीएच शिक्षण घेतलं आहे. वेदांगी आणि अभिषेक यांच्या लग्नसोहळ्याचे काही खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या नवविवाहित दाम्पत्याचे खुप खुप अभिनंदन!!!