आपण ज्या प्रकारच्या आहाराचे सेवन करतो त्यावर आपले आरोग्य, बुद्धी आणि विचार अवलंबून असते. त्यामुळे आहाराचे सेवन करताना विचारपूर्वक करण्याचे नेहमी सांगितले जाते. मांसाहारी खाद्य पदार्थाने अधिक पोषण मिळते असे अनेक लोकांना वाटते. मात्र, शाकाहारी अन्न पदार्थांचे सेवन करून सुद्धा उत्तम आरोग्य मिळवता येते हे सिद्ध झालं आहे. जगभरात वैश्विक शाकाहार दिन साजरा केला जातो. शाकाहारी अन्न पदार्थाला प्रोत्साहन देणे आणि त्याच्या फायद्यांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारही केवळ शाकाहारी अन्न पदार्थांचे सेवन करताना दिसतात यात विशेष करून अमिताभ बच्चन यांचेही नाव घेण्यात येते.
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे देखील शुद्ध शाकाहारी अन्न पदार्थ खात असून प्राण्यांचे कुठलेच प्रथिनयुक्त पदार्थ खाणे त्यांनी आवर्जून टाळले आहे. आपल्या आहारातून मांस, मासे आणि अंडी देखील त्यांनी वर्ज्य केली आहेत. इतकंच काय, पण हे दोघेही दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थही खाण्याचं आवर्जून टाळत आहेत.विगन या कडक शाकाहाराच्या अमेरिकन संकल्पनेत प्राण्यांपासून मिळणारे सर्व पदार्थ वर्ज्य असतात, फक्त फळे, भाजीपाला, डाळी अशांचा जेवणामध्ये समावेश असतो. नियमित व्यायामासोबत गेल्या ५ वर्षांपासून रितेश आणि जेनेलिया खाण्याच्या बाबतीतले हे नियम काटेकोरपणे पाळताना दिसत आहेत आणि यातून खूप चांगला इफेक्ट त्यांच्या शरीरामध्ये जाणवू लागल्याचे ते दोघेही सांगतात. असे असले तरी चिकन आणि मटण सारख्या पदार्थांची आठवण खाणाऱ्यांना अनेकदा येते, त्यामुळे शाकाहारी लोकांना देखील असे पदार्थ चाखता यावेत या हेतूने त्यांनी मटण आणि चिकनचा फील देणारे खाद्य पदार्थ बाजारात आणले आहेत. गेल्या ३ वर्षांपासून त्यांनी ह्या पदार्थांवर खूप रिसर्च करून आणि त्यावर मेहनत घेऊन कुठले पदार्थ बाजारात आणले जावेत याचा विचार केला. अमेरिका, जर्मनी आणि भारतातील सायंटिस्ट आणि टेक्नॉलॉजी वापरून “इमॅजिन मिट्स” नावाने त्यांनी खाद्यपदार्थांची कंपनी सुरु केली आहे.
हे सगळे पदार्थ शाकाहारी आहेत जे डायरेक्ट प्लॅन्टस मधून येतात. नॉनव्हेज न खाणाऱ्याना आभासी फील ह्या प्रॉडक्ट्स मुळे येतो. नगेट्स, सिककबाब, बिर्याणी असे सुरुवातीला ९ रेडी टू ईट खाद्यपदार्थ त्यांनी मार्केटमध्ये आणले आहेत, जे झिरो कोलेस्ट्रॉल आणि हाय प्रोटीन पासून बनवले आहेत. चांगल्या आरोग्य जीवनशैली साठी जे नॉनव्हेज खाऊ शकत नाहीत त्यांना हि टेस्ट सेम मटण खाल्ल्यासारखीच लागेल पण हे पूर्णपणे व्हेजिटेरियन असणार आहे. या खाद्यपदार्थमध्ये आणखी ४ पदार्थ नुकतेच त्यांनी सामील केले आहेत, या पदार्थांना खास स्मोकी फ्लेवर देण्यात आला आहे. त्यामुळे बाजारात देखील त्यांच्या या खाद्यपदार्थांना विशेष मागणी असलेली पाहायला मिळत आहे. रितेश आणि जेनेलिया यांच्या या अनोख्या खाद्य व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा..