Breaking News
Home / जरा हटके / “नो बिंदी नो बिजनेस”… सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ… अनेकांनी उठवला आवाज
shefali vaidya no bindi no business
shefali vaidya no bindi no business

“नो बिंदी नो बिजनेस”… सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ… अनेकांनी उठवला आवाज

काही उत्पादकांनी दिवाळीनिमित्त प्रसारित केलेल्या जाहिरातींमध्ये बहुसंख्य हिंदूंना काहीतरी खटकलं. ते नेमकं काय याचा ऊहापोह करणाऱ्या शेकडो पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री मयुरी वाघ यांची दिवाळी निमित्त आलेली पोस्टर पाहून प्रसिद्ध लेखिका ब्लॉगर शेफाली वैद्य म्हणतात, मराठी दीपावली अशी असते, रंगीत, आनंदी, हसरी, सालंकृत, शुभ! सोनाली कुलकर्णी अशी मयताला आल्यासारखी काय दिसते?

shefali vaidya no bindi no business
shefali vaidya no bindi no business

हॅशटॅग नो बिंदी नो बिजनेस व्हायरल झाल्यामुळे शेफाली वैद्य यांच्यावर विविध स्तरावून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत त्यावर त्या म्हणतात, “ओ फेमिनिष्ठ ताई, तुम्ही कुंकू लावा नाहीतर तुमच्या नेहमीच्या कळकट्ट पारोश्या घाणेरड्या अवतारात झिंज्या सोडून नाचा, तो तुमचा प्रश्न आहे. मी काही फतवा काढलेला नाहीये की सर्व लेडीज बायकांनी बिंदी लावलीच पाहिजे. मी स्पष्टपणे ब्रॅंडसना सांगतेय की दिवाळीच्या प्रॉडक्टसची जाहिरात करताना लक्षात ठेवा की दिवाळी हा एक हिंदू सण आहे. हिंदूंचे पैसे पाहिजेत ना, मग हिंदू परंपरांचा, हिंदू रितीरिवाजांचा सन्मान करायला शिका. आमच्या सणामध्ये भुंड्या कपाळाच्या बायका सुतकी चेहेऱ्याने वावरत नाहीत, मग जाहिरातीत तरी असं का असावं? NoBindiNoBusiness हा हॅशटॅग सुरु करताना स्पष्ट म्हटलं होतं की हा माझ्यापुरता निर्णय आहे. माझे कष्टाचे पैसे आहेत, ते कशावर खर्च करायचे ते मी ठरवणार. हॅशटॅग ट्रेंड झाला तो इतर खूप लोकांना माझ्यासारखंच वाटत होतं म्हणून. मी फक्त त्या खदखदीला वाट करून दिली.”

writer blogger shefali vaidya
writer blogger shefali vaidya

त्या पुढे म्हणतात, “आतापर्यंत हा हॅशटॅग फक्त ट्विटर वर जवळजवळ सात लाख लोकांनी बघितलाय. त्यातल्या अर्ध्या लोकांनी जरी हे खरोखर मनावर घेतलं तर ब्रँडस ना बदलावंच लागेल, कारण त्यांना हे स्पष्ट दिसतंय. माझ्यावर जितकी वैयक्तिक चिखलफेक होते आहे तितकाच हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतोय आणि तेच तर मला अभिप्रेत आहे. एक पैसाही प्रमोशन वर न खर्च करता माझा विचार आज फेसबुक आणि ट्विटर मिळून दहा लाख लोकांपर्यंत पोचलाय, तुम्ही बसा माझ्या नावाने बोटं मोडत आणि आक्रस्ताळा थयथयाट करत!”

शेफाली वैद्य यांनी अतिशय स्पष्ट आणि कमी शब्दांत लिहिलं होते की, ज्या ब्रँड मधील स्त्री मॉडेल टिकली लावलेली नसेल त्याच्याकडून मी स्वतः काही खरेदी करणार नाही. कुणाला जबरदस्ती नाही की प्रत्येकाने टिकली लावलीच पाहिजे. फक्त जो ब्रँड आहे त्यातील स्त्री मॉडेलने ती लावावी हा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या या वैयक्तिक निर्णयाला नेटकऱ्यांनी उचलून धरले आहे. बरेच जण समर्थनाच्या भूमिकेत तर इतर त्यांना खोटे ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

3 comments

  1. Madhuri Pantsachiv

    Wholeheartedly agree with this
    Hindus should not be taken for a ride for your business promotion

  2. Ashish Nishikant Raut

    #NOBINDINOBUSINESS

  3. I support good thinking and every hindus should follow this

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.