Breaking News
Home / मराठी तडका / तुझ्याशिवाय आयुष्य अकल्पनीय आहे.. जगाला माझी पहिली रील दाखवण्याची प्रतीक्षा करू शकत नाही..
amruta khanvilkar best friend sonali khare
amruta khanvilkar best friend sonali khare

तुझ्याशिवाय आयुष्य अकल्पनीय आहे.. जगाला माझी पहिली रील दाखवण्याची प्रतीक्षा करू शकत नाही..

आयुष्यात तुम्ही कधी कुणाला भेटलात आणि वाटले की तुम्ही त्याला वर्षानुवर्षे पासून ओळखता? खरंच एवढी घट्ट मैत्री होऊ शकते का! होय हे खरे आहे सिनेजगतातील अमृता खविलकर आणि सोनाली खरे या दोन अभिनेत्री खऱ्या आयुष्यातील जिवलग मैत्रिणी.. इतक्या जवळच्या की सख्ख्या बहिणीच्या पेक्षाही जास्त एकमेकींना जीव लावणाऱ्या.. त्यांच्या मैत्रीची कोणाशीही तुलना करता येणार नाही, एकत्र फिरणे, मजा मस्ती करणे, कमालीचा गोंधळ घालणे याशिवाय त्या जगण्याचा विचार करूच शकत नाहीत..

amruta khanvilkar best friend sonali khare
amruta khanvilkar best friend sonali khare

अभिनेत्री अमृता आणि सोनालीची ही जीवापाड मैत्री तशी फार कमी लोकांना माहित आहे. अमृता तिच्या चाहत्यांसोबत स्वतःचे ​अप्रतिम फोटो नेहमीच ​शेअर करत असते. ​तिचा हा जिवलग सोनाली सोबतच पहिला व्हिडीओ शेअर करण्यासाठी ती अगदी आतुर झाली होती. सोनाली सोबत एव्हरग्रीन माधुरीच्या लज्जा चित्रपटातील बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल या गाण्यावर धम्माल व्हिडिओ रील शेअर केला आहे. नखरेल अदांनी गाण्याचा पुरेपूर आनंद लुटत बनविलेला हा व्हिडीओ प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आहे. सोनालीला अमृता एवढी एनर्जी देणे खूप अवघड गेल्याचे ती प्रांजळपणाने स्वीकार करते. मराठमोळ्या वेशभूषेत या दोघींना पाहून माधुरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. नेहमीप्रमाणेच ​या सुंदर रीलसाठी चाहत्यांकडून लाइक्स आणि प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे..​

best friends forever
best friends forever

अमृताच्या ​अभिनय कारकिर्दी बद्दल बोलायचं झालं तर ​गोलमाल, साडे माडे तीन, मुंबई सालसा, फूंक, दोघात तिसरा आता सगळं विसरा, गैर, नटरंग, अर्जुन धूसर, फक्त लढ म्हणा, शाळा, आयना का बायना, हिम्मतवाला, बाजी, वेलकम जिंदगी, राझी, सत्यमेव जयते, डॉ काशिनाथ घाणेकर आणि मलंग यासारख्या अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये झळकली​ आहे​. या चित्रपटांमध्ये तिनं साकारलेल्या भूमिकांचं ​विविध स्तरातून ​कौतुकही ​झाले. नॅशनल जिओग्राफी चॅनेल वरील तिच्या सूत्रसंचलनाचे रसिकांनी विशेष कौतुक केले आहे. छोट्या पडद्यासह ​सिने जगतातही ​आजवर नृत्याचे ​​कलाविष्कार दाखविले आहेत. ​​आगामी काळात सातत्यानं वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये ​ती पाहायला मिळेल अशी आशा करूया.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.