कीर्तनकार शिवलीला पाटील बिग बॉस मराठी तिसऱ्या परवाच्या सहभागापासूनच नेटकऱ्यांच्या ट्रोलला सामोरे जावे लागले होते. अगदी “कलियुगातले किर्तनकार” अशा उपाधीने चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. पहिल्या आठवड्यात शिवलीला घरात चांगली काम करत होती, पण अचानक दुसऱ्या आठवड्यात आजारी वाटू लागल्याने बिग बॉसने शिवलीला पुढील औषधे आणि उपचार घेण्यासाठी घर सोडावे लागेल असे सांगितले..

आज कीर्तनकार शिवलीला बिग बॉसच्या घरात नसेल तरीही प्रेक्षकांना तिची एन्ट्रीच मुळात आवडली नव्हती, वारकरी संप्रदाय आयोजकांवर नाराज असल्याच्याही बातम्या व्हायरल होत होत्या. बिग बॉसच्या घरात संतांची शिकवण देण्याचा प्रयत्न करीत होते परंतु माझ्या सहभागाने वारकरी संप्रदायांच्या भावना दुखावल्या असल्याने तिला वाईट वाटत होते. “दोन हस्तक आणि एक मस्तक टेकवून माफी मागते” अशी भावना तिने आज व्यक्त केली आहे. ती पुढे म्हणते, मला प्रसिद्धीची अपेक्षा मुळीच नव्हती, संतांनी दिलेली शिकवण सर्वांपर्यंत पोहचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला, माझी तेवढी पात्रता नाही पण परमार्थाचा अर्थ समजावण्याचा माझा उद्देश होता तो सफल झाला नाही याची खंत वाटते. समस्त वारकरी संप्रदाय आणि वारकरी मंडळी शिवलीला पाटील यांना माफ करतील की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या सर्व गोष्टींवर सोशल मीडियामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकरी म्हणतात.. जेवढा मोठा संत तेवढी त्याची नैतीकता महत्वाची, नैतिकता सोडणारी संतमंडळी म्हणजे शापच. आपल्याला लाखो लोक पाहतात त्यामुळे आपले आचरण उच्च हवे. आपण यात कमी पडलात.. अशी काय गरज पडली की बिग बॉस मध्ये जावे लागले. आता बहुदा लोकच तुम्हाला कोपरा पासून हात जोडत असतील.. तर काहींनी सद्सद्विवेक बुद्धी वापरत संतांच्या शिकवणीचा आधार घेत चुका होत असतात मोठ्या मनाने माफ करणे हे आपल्या संतांची शिकवण आहे असेही म्हटले आहे.