Breaking News
Home / मराठी तडका / कुणितरी येणार येणार गं.. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या अभिनेत्याने दिली गोड बातमी
sanjay patil baby good news
sanjay patil baby good news

कुणितरी येणार येणार गं.. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या अभिनेत्याने दिली गोड बातमी

डॅड टू बी असे म्हणत सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्याने पत्नीचे डोहाळजेवणाचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हा अभिनेता आहे संजय पाटील. मालिकेत त्याने उदय शिर्के पाटीलचे पात्र साकारले होते. उदयचे पात्र मजेशीर असल्याने त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून दाद मिळाली होती. काही दिवसांपूर्वी मालिकेने २५ वर्षांचा लिप घेतला होता. त्यामुळे गौरी आणि जयदीपच्या पुनर्जन्माची कथा दाखवण्यात येत आहे. म्हणूनच मालिकेतील काही जुन्या पात्रांची एक्झिट करण्यात आली आहे. पुनर्जन्माच्या कथेत संजयला काम मिळणार असे त्यावेळी बोलले जात होते.

sanjay patil good news
sanjay patil good news

संजयने या अफवेवर तूर्तास तरी मालिकेतून एक्झिट घेतल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान संजय आता लवकरच बाबा होणार आहे त्यामुळे घरात येणाऱ्या बाळाच्या तो प्रतीक्षेत आहे. मार्च २०२२ मध्ये संजय पाटील अबोली सोबत विवाहबद्ध झाला होता. एका शॉर्टफिल्मच्या निमित्ताने नाशिकला गेला होता. तिथेच सेटवर त्याची अबोलीसोबत ओळख झाली होती. अबोली ही लेखिका आहे, चिरंजीव या पुस्तकाचे तिने लेखन केले आहे. यासोबतच ती योगा ट्रेनर देखील आहे. या निमित्ताने दोघे एकमेकांना फोनवर बोलू लागले होते. मागील काही वर्षांत दरम्यान दोघांची मैत्री वाढत गेली आणि यातच त्यांच्या प्रेमाचे सूर जुळत गेले. संजय पाटील हा गिरगावात लहानाचा मोठा झाला. शाळेत असल्यापासूनच तो नृत्याचे सादरीकरण करायचा.

actor sanjay patil wife abolee
actor sanjay patil wife abolee

पुढे देवेंद्र पेम यांच्या अभिनय कार्यशाळेत त्याने प्रवेश घेतला आणि त्यानंतर त्याचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. शॉर्ट फिल्म, सुकन्या, विठू माऊली अशा मालिकांमधून त्याला कामं मिळत गेली. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून त्याच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळत गेला. सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर संजय पूर्ण वेळ पत्नीसोबत घालवताना दिसत आहे. अनेकदा तो अबोलीसोबत रिल्स बनवताना देखील पाहायला मिळाला आहे. पत्नी आणि होणाऱ्या बाळाची तो काळजी घेत आहे. काल सोमवारी अबोलीची डोहाळजेवण साजरे करण्यात आले. या सोहळ्याचे काही क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कुणीतरी येणार येणार गं असे म्हणत संजयने ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.