Breaking News
Home / जरा हटके / गेल्या काही वर्षात जेवढा माझा आगाऊपणा वाढलाय तेवढा.. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोहमने घेतली फिरकी
suchitra bandekar birthday special
suchitra bandekar birthday special

गेल्या काही वर्षात जेवढा माझा आगाऊपणा वाढलाय तेवढा.. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोहमने घेतली फिरकी

प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा १० ऑक्टोबरला वाढदिवस साजरा झाला. सुचित्रा बांदेकर या शाळेत असल्यापासूनच नाटकातून काम करत असत. पुढे त्यांनी मराठी सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला त्यानंतर त्या हिंदी मालिका सृष्टीकडे वळल्या. आदेश बांदेकर या इंडस्ट्रीत नाव मिळवण्यागोदरच सुचित्रा बांदेकर यांचे या इंडस्ट्रीत नाव होते. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या प्रवासात एकमेकांची भक्कम साथ त्यांना मिळाली होती. होम मिनिस्टर या कार्यक्रमाने आदेश बांदेकर मोठी लोकप्रियता मिळवत आहेत.

aadesh bandekar soham bandekar
aadesh bandekar soham bandekar

या कार्यक्रमानिमित्त त्यांना सतत बाहेर राहावे लागते. पण या प्रवासात त्यांना सुचित्राकडून भक्कम साथ मिळाली. सोहम आणि सुचित्राच्या सहकार्यामुळेच मी हे यश मिळवू शकलो अशी प्रतिक्रिया आदेश बांदेकर देत असतात. सुचित्राच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर सुचित्राचा फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या. तर मुलगा सोहमने त्याच्या आगाऊपणाबद्दल आज त्याचे मत व्यक्त केलं आहे. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तो म्हणतो की, गेल्या काही वर्षात जेवढा माझा आगाऊपणा वाढलाय तेवढीच तुझी सहनशीलता. अशीच नेहमी सुंदर दिसून आम्हाला तुझे फोटोज काढू दे. असे म्हणत त्याने आईची फिरकी घेतली आहे.

suchitra bandekar pets
suchitra bandekar pets

सोहम आणि सुचित्रा बांदेकर यांचे बॉंडिंग खूप छान आहे. सुचित्रा म्हणजे घरी एक वाघ असल्याचा फिल असतो असे तो बाईपण भारी देवा चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत म्हणाला होता. माझ्या मित्रांनी माझ्या घरी जी नाही ती भाजी खाल्ली आहे तेही आईच्या धाकामुळे. माझे मित्र आईला दबकून असतात असेही तो म्हणाला होता. बाईपण भारी देवा चित्रपटात दोघेही आई मुलाच्याच भूमिकेत झळकले होते. पण दोघांनी कधीच एकत्रित सिन केला नाही. उलट ती समोर नव्हती हेच चांगलं होतं नाहीतर मला दडपण आलं असतं असे तो आईच्या धाकाबद्दल बेधडकपणे बोलून टाकतो. त्यामुळे त्यांच्यातील हे बॉंडिंग नेमकं कसं आहे याचा तुम्हाला अंदाज येतो.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.